Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचे खास नियोजन; नाशिक, मनमाडहून धावणार स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

9

Special Train For Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईत ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून अनुयायी येणार आहेत. रेल्वेने त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी चोख व्यवस्था केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
mahavarinirvan day

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईत ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून अनुयायी येणार आहेत. रेल्वेने त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी चोख व्यवस्था केली आहे. नाशिकरोड, मनमाड स्थानकांवरही चोख बंदोबस्त आहे.

विशेष गाड्या
मध्य रेल्वे ८ डिसेंबरपर्यंत १६ विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे. ज्यात नागपूर ते मुंबई ८ गाड्या, दादर ते नागपूर दोन गाड्या, कलबुर्गी-मुंबई दोन गाड्या, आदिलाबाद-दादर दोन गाड्या, अमरावती-मुंबई दोन गाड्या आहेत. ५ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या परळ-कुर्ला/ठाणे आणि कल्याण दरम्यान तसेच हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी/पनवेल सुरू राहतील.
लाडक्या बहिणी साक्षीला! महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा, पंतप्रधानांसह २२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विशेष बुकिंग काउंटर
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने चोवीस तास मदत कक्ष सुरू राहील. येथे अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत. ७ डिसेंबरपर्यंत अनारक्षित तिकिटे आणि रेल्वे गाड्यांच्या चौकशीसाठी चैत्यभूमी येथे दोन यूटीएस-सह चौकशी काउंटर असतील. या स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी दादर येथे २२३, सीएसटी येथे १६६, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १०५, ठाणे येथे १०३ आणि कल्याण येथे ७८ असे एकूण ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दादर येथे आरपीफचे १२०, सीएसटी येथे ४०, कल्याण येथे ३० कर्मचारी तैनात आहेत. दादर येथे २५० आणि सीएसटी ८० रेल्वे पोलिस तैनात आहेत. त्यांच्या मदतीने विशेष तिकीट तपासणी पथके आरक्षित डब्यांमध्ये अधिकृत प्रवाशांनाच प्रवेश मिळवून देतील.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?
गर्दी व्यवस्थापन
दादर येथील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे आणि मुंबई सीएसटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ८ मधील उपलब्ध जागेजवळ होल्डिंग एरिया तयार केला आहे. दादरला गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश/निर्गमन योजना आहे. दादर येथील गर्दी सुरळीत व्हावी यासाठी मध्य पूल आणि बीएमसी पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मुंबई सीएसटी, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील चौकशी कार्यालयाजवळ ट्रेन क्रमांक आणि विशेष गाड्यांच्या वेळा असलेले बॅनर/स्टँड लावले जातील. संबंधित ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, व्हील चेअर, स्ट्रेचर आणि भोजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
प्लॅटफॉर्म तिकीट बंद

महापरिनिर्वाणदिनाची गर्दी लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू यांनांच ९ डिसेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येईल. मुंबई सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण, नागपूर, वर्धा, पुणे, सोलापूर, भुसावळ, बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिकरोड या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. ९ डिसेंबरपर्यंत वाणिज्य निरीक्षक चोवीस तास तैनात राहतील. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्थानकांवर अधिकारी तैनात केले जातील. गुप्तचर अधिकारी गर्दीचे निरीक्षण करतील.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.