Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Rules You Must Know Before Wearing Tulsi Mala : तुळशीची माळ घातल्याने मन शांत आणि आत्मा शुद्ध होतो, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच कुंडलीतील बुध आणि गुरु बलवान होतात. तुळशीची माळ धारण केल्याने वास्तूदोष दूर होतो. ही जपमाळ धारण केल्याने व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक शुद्धता वाढते. व्यक्तींमधील नकारात्मकता दूर होते. ही जपमाळ ध्यान आणि साधना वाढवण्यास मदत करते. परंतु, जर तुम्ही देखील तुळशीची माळ धारण करत असाल तर चुकूनही या ५ ठिकाणी घालू नका
हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान देण्यात आले आहे. अनेक हिंदू धर्मात सकाळच्या दिवसाची सुरुवात ही तुळशीची पूजा सुरु करुन होते. शास्त्रात तुळशीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व त्याच्या माळेला देखील आहे.
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या आरोग्याचे रक्षण होते. तुळशीची माळ घातल्याने मन शांत आणि आत्मा शुद्ध होतो, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच कुंडलीतील बुध आणि गुरु बलवान होतात. तुळशीची माळ धारण केल्याने वास्तूदोष दूर होतो. ही जपमाळ धारण केल्याने व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक शुद्धता वाढते. व्यक्तींमधील नकारात्मकता दूर होते. ही जपमाळ ध्यान आणि साधना वाढवण्यास मदत करते. परंतु, जर तुम्ही देखील तुळशीची माळ धारण करत असाल तर चुकूनही या ५ ठिकाणी घालू नका
तुळशीच्या माळेचे फायदे
तुळशीची माळ ही मंत्रोच्चारासाठी वापरली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्णा या मंत्रांचा जप करताना तुळशी जपमाळेला विशेष महत्त्व आहे. या जपमाळामुळे मंत्रांची शक्ती वाढते. जप करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते.
तुळशीची जपमाळ कोणत्या ठिकाणी धारण करू नये? स्मशानभूमीत किंवा अंत्यसंस्कारात
तुळशीची माळ स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कारात घालून जाऊ नये. तुळशीची जपमाळ ऊर्जेसाठी संवदेनशील असते. या ठिकाणी नकारातमक ऊर्जा राहाते. त्यामुळे जपमाळाची आध्यात्किम ऊर्जा बाधिक होते.
मांसाहारी ठिकाणी
तुळशीची माळ ही भोजनालयात किंवा दारूच्या दुकानात घालून जाऊ नये. तसेच ही माळ सात्त्विकेतेचे प्रतीक मानण्यात येते. तामसिक भोजन करताना ही माळ घालू नये.
कत्तलखाना
तुळशीची जपमाळ घालून कत्तलखान्यासारख्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे कारण ही जपमाळ अहिंसा आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. शौचालयात जाण्यासारख्या दैनंदिन कामात जपमाळ घालण्यास मनाई आहे कारण ही जपमाळ पवित्रतेचे प्रतीक मानली जाते.