Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठे यश मिळाल्यानंतर अखेर राज्यात महायुती सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथवधी झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात नव्या सरकारचा शपथविधी झाला आणि त्यानंतर काही मिनिटातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमध्ये राज यांनी फडणवीसांना खर तर २०१९ साली संधी मिळायला हवी होती. पण तेव्हा आणि २०२२ मध्ये जे काही घडले त्यामुळे त्यांची संधी हुकल्याचा उल्लेख केला.
शपथविधीआधीच महाराष्ट्रसाठी आली गुड न्यूज! राज्याच्या आर्थिक विकासाला मिळाला बुस्टर डोस; वर्ल्ड बँकेकडून इतक्या कोटींचे…
पुढे राज म्हणतात की, विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाला जे अविश्वसनीय बहुम दिले आहे त्याचा वापर ते राज्यासाठी, मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी तसेच संस्कृतीसाठी वापर करती अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुढील पाच वर्षासाठी राज्य सरकारच्या चांगल्या उपक्रमांना माझा आणि मनसेचा पाठिंबा असल्याचे राज यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट जशी आहे तशी…
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.
पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की…
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !
राज ठाकरे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा मुख्यमंत्री होईल असे म्हटले होते. निकालात मात्र मनसेला एकही जागा मिळू शकले नाही. आज देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊन राज ठाकरे यांनी पुढील ५ वर्षासाठीची मनसेच्या राजकारणाची दिशा ठरवली आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.