Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pushpa 2 Worldwide Collection: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात २७९.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हायलाइट्स:
- ‘पुष्पा २: द रुल’ ठरला सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा
- RRR आणि बाहुबली २ पडले मागे
- ‘जवान’, ‘पठाण’ जवळपासही नाहीत
परदेशातही छप्परफाड कमाई
‘पुष्पा २’ने देशातच नाही तर परदेशातही चांगली कमाई केली. सुकुमार दिग्दर्शित या सिनेमासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आणि या चित्रपटाला बंपर आगाऊ बुकिंग मिळाले. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कमाईचा मोठा आकडा गाठला आहे.
‘पुष्पा २’ ने ओपनिंगच्या दिवशी मोडले रेकॉर्ड
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सुमारे १७४.९ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने तेलगूमध्ये सर्वाधिक ९०.९५ कोटी रुपये आणि हिंदीमध्ये ७०.३ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने तामिळमध्ये ०७.७ कोटी, कन्नडमध्ये १ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये ०४.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’ (१५६ कोटी) आणि ‘बाहुबली २’ (१५३ कोटी) या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले. ‘कल्की २८९८ एडी’, ‘जवान’, ‘पठाण’ हे चित्रपट तर ‘पुष्पा २’च्या कमाईपुढे बरेच मागे आहेत.
महिलेच्या मृत्यूनंतरही सुधारले नाहीत! ‘पुष्पा २’च्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग; काही ठिकाणी तोडफोड
जगभरात किती झाली कमाई?
या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास ‘पुष्पा २’ने आतापर्यंतच्या सर्व हिट चित्रपटांना मागे टाकले. ‘पुष्पा २’ ने पहिल्याच दिवशी जगभरात मिळून २७९.२० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने रीलिजच्या पहिल्या दिवशीच परदेशात ७० कोटींची कमाई केली आहे, ज्यामुळे ‘RRR’ (२२३ कोटी) आणि ‘बाहुबली २’ (२१७ कोटी) हे चित्रपट मागे पडले आहेत. ‘आरआरआर’ने परदेशात पहिल्या दिवशी ६७ कोटी रुपये कमावले होते, तर ‘बाहुबली २’ची पहिल्या दिवसाची परदेशातील कमाई ६५ कोटी रुपये होती.
रीलिजपूर्वीच मोडलेले रेकॉर्ड
‘पुष्पा २’च्या पहिल्या दिवसाचे आकडे आणि दुसऱ्या दिवसाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहता असे चित्र आहे की, पहिल्याच वीकेंडमध्ये हा सिनेमा ५०० कोटींचा टप्पा गाठेल. याशिवाय देशातील विविध शहरात या सिनेमासाठी रात्रीचे २ शो वाढवण्यात आले आहेत. ‘पुष्पा २’ ने रिलीजपूर्वी अनेक विक्रम मोडीत काढले आणि रीलिजनंतरीही ही घौडदौड सुरू आहे. या कलेक्शनने निर्मात्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांमध्येच सुखाची लाट पसरली आहे.