Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त ३ दिवसांत ५०० कोटी पार! पुष्पा २ चा थिएटरमध्ये बोलबाला, केवळ भारतातच किती कमावले माहितीये?

9

Pushpa 2 Earning: पुष्पा २ सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षक अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या ‘पुष्पा २’ ला पसंती देत आहेत. ‘पुष्पा २’ ने रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली पण त्यानंतर त्यात थोडी घट झाली. पण शनिवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने पुन्हा नवा विक्रम केला. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २’ ने ३ दिवसात जगभरात ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा पहिला चित्रपट आहे ज्याने इतक्या वेगाने ५०० कोटींचे कलेक्शन केले आहे.

‘पुष्पा २: द रुल’ ची निर्मिती कंपनी Mythri Movie Makers ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, ‘पुष्पा २’ ने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली केल्याचे सांगितले. पुष्पा २ ने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतात ३ दिवसात चित्रपटाने ३८३.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘पुष्पा २’ पाहून पैसे फुटक न घालवण्याची कोकणहार्टेड गर्लची विनंती, सिनेमातली ही गोष्टी आहे अगदीच बेकार
‘पुष्पा २: द रुल’चे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ ने शनिवारी भारतातील सर्व भाषांमध्ये ११५ कोटी रुपये जमा केले. तेलगूमध्ये या चित्रपटाने ३१.५ कोटी रुपये कमावले, तर हिंदीमध्ये चित्रपटाने ७३.५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने तमिळमधून ७.५ कोटींची कमाई केली. कन्नडमध्ये केवळ ८० लाखांची कमाई केली. मल्याळम भाषेतून १.७ कोटी रुपये जमवले आहे.
शोलेमधला तो आयकॉनिक सीन, धर्मेंद्र यांनी प्रेमाच्या नादात स्वत:च्या खिशाला लावलेली कात्री, विनाकारण उडवले हजारो रुपये
‘पुष्पा २: द रुल’चा हिंदी कलेक्शन जास्त, तर कन्नडमध्ये कमी

‘पुष्पा २: द रुल’ ने भारतात तीन दिवसांत एकूण ३८३.७ कोटी रुपये जमा केले आहेत. तेलुगूमध्ये आतापर्यंत १५१.०५ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधून २००.७ कोटी रुपये कमावल्याचे जाहिर केले. बॉक्स ऑफिस आकडेवारीच्या बाबतीतही ‘पुष्पा २’ अनेक विक्रम केले आहे. ३ दिवसांत २०० कोटींची कमाई करणारा हा हिंदीतील पहिला तेलगू चित्रपट ठरला आहे. कन्नड मध्ये सिनेमाने २.४७ कोटी रुपयांची कमाई केली.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.