Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 9 डिसेंबर 2024: मिथुन राशीने कामात फोकस ठेवा ! धनू राशीला नवीन संपर्काचा फायदा ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 9 December 2024 In Marathi : 9 डिसेंबर, मेष राशीच्या मेहनतीला यश मिळेल. वृषभचे लोक खरेदी जास्त करणार.कर्क राशीने स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. कन्या राशीची कामे उत्साहाने पूर्ण होतील.मकर राशीला खरेदी-विक्रीच्या व्यवसायात लाभ तर मीन राशीच्या जातकांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : मेहनतीला यश मिळेल
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत लाभ असून पार्ट टाइम व्यवसायासाठी वेळ मिळेल. तुमच्या मेहनतीला यश मिळेल. खूप संघर्षानंतर आज तुम्हाला अडचणींमधून थोडासा दिलासा मिळणार आहे. आर्थिक कष्ट आता कमी होतील. प्रवासाचा योग आहे. बँक बॅलन्स वाढतो आहे.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : खरेदी जास्त करणार, पाहुणे येणार
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. मंगल कार्यात सहभागी होणार आहात. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी खूप खरेदी करणार आहात. पाहुण्याचे आगमन होणार आहे. तुमचा मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळेल, पण नियोजन नीट करावे.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : कामावर फोकस करा, फालतू प्रसिद्धी नको
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत यश तसेच तुमची प्रगती पाहून सगळे सुखावतील. तुमच्या प्रगतीची गती कायम ठेवण्यासाठी मेहन करावी लागेल, अन्यथा भविष्यात प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. फालतू प्रसिद्धीपासून दूर राहा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.
कर्क आर्थिक राशिभविष्य : स्वतःकडे दुर्लक्ष नको
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण खूप व्यस्त राहणार आहात. कुटुंबाच्या भल्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता, पण स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला काही कारणामुळे टेन्शन येणार आहे. तुम्ही रिलोकेशनचा विचार करू शकता. प्रवासाला गेल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.
सिंह आर्थिक राशिभविष्य : आळस सोडा, कामाला लागा
सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या बाबतीत लाभ आहे आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. व्यवसाय कामे येत आहेत पण वेळेत पूर्ण होत नाहीत याची काळजी तुम्हाला आहे. जे काही काम करता त्याचा नीट विचार करा. नोकरी, व्यवसायात सुधारणा करण्यासाठी आळसाचा त्याग करा.
कन्या आर्थिक राशिभविष्य : उत्साहाने काम पूर्ण कराल
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत प्रगती आहे. पण आज खूपच धावपळ आहे, तरी काळजी करू नका कारण त्याचे चांगेल परिणाम मिळणार आहेत. उत्साहाने तुम्ही आपले काम पूर्ण कराल. प्रत्येक कामात नशिबाची साथ आहे तुमची पेंडीग कामे पूर्ण झाल्यामुळे समाधान मिळेल. घरात वातावरण ठिक असेल.
तुळ आर्थिक राशिभविष्य : विरोधक त्रास देण्याची शक्यता
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रात विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. साहस आणि बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही अडचणींवर तोडगा काढाल. मनात भयानक विचार येतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कामात यश आहे हे मात्र नक्की आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : ताणतणावाला दूर ठेवा
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज दिवस ठिक असून करिअरच्या बाबतीत अचानक चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात ताणतणाव फार तुमच्या अंगावर येवू देवू नका. बदलत्या परिस्थितीत नवीन योजना यशस्वी होईल. जुने वाद आणि अडचणी दूर होतील. अधिकाऱ्यांसोबत समजूतदारपणा वाढेल. निराशाजनक विचारांना मनात प्रवेश देऊ नका, वेळ तुमच्या बाजूने आहे.
धनू आर्थिक राशिभविष्य : नवीन संपर्कांचा फायदा होईल
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. नवीन संपर्कांमुळे फायदा मिळेल. तुमचे थांबलेले पैसे मिळतील. रोजची कामे नीत्यनियमाने पूर्ण करा. संध्याकाळी मंगल कार्यात सहभागी होणार आहात. नवीन प्रोजेक्ट पटपट मार्गी लागतील असे पाहा. कामे वाढत आहेत, नियोजन करा.
मकर आर्थिक राशिभविष्य : खरेदी-विक्रीच्या व्यवसायात लाभ
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत नशिबाची उत्तम साथ आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवसायात लाभ असून चांगली बातमी मिळणार आहे. मित्र कामात सहकार्य करतील. फालतू वादविवाद आणि समस्यांपासून दूर राहा. सासरकडून मदत मिळेल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : संपत्तीमध्ये वाढ, कामे पूर्ण होतील
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला आहे. आयात-निर्यात व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय फायनल करा. आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टीत रुचि वाढेल. वेळेचा योग्य वापर केल्यास तुमचा भाग्योदय निश्चीत आहे. संपत्तीमध्ये वाढ आणि थांबलेली कामे पूर्ण होतील.
मीन आर्थिक राशिभविष्य : गुप्त शत्रूंपासून सावध राहा
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत लाभाचा आहे. तुमची प्रगती होईल आणि थांबलेली कामे पूर्ण होतील. अध्ययन आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. वादग्रस्त प्रकरणं संपुष्टात येतील. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कुणाला कर्ज देण्याचे टाळावे. प्रवासाचा योग आहे त्यात लाभ होईल.