Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य 9 डिसेंबर To 15 डिसेंबर 2024 : चंद्र, मंगळाचे राशीपरिवर्तन, या राशीसाठी धनलाभाचे संकेत ! प्रोजेक्ट पूर्ण होणार ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
Weekly Career Horoscope, 9 December To 15 December 2024 : डिसेंबरचा हा दुसरा आठवडा असून, या आठवड्यात चंद्र आणि मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. चंद्र हा मेष राशीत तर मंगळ हा कर्क राशीत परिवर्तन करेल. चंद्र आणि मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे कर्क, तुळ सह या ५ राशींचा भाग्योदय होणार आहे. व्यवसायात नफा असून नोकरीत उत्तम यश आहे. प्रवासामुळे लाभ मिळेल तसेच घरातील वातावरण समाधानी असेल. मेष ते मीन पर्यंत आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल, चला पाहूया या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य.
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : ऑफिसच्या कामात प्रगती
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक आहे. ऑफिसच्या कामात प्रगती आहे. प्रोजेक्ट यशस्वी होतील. जीवनात दृढ निर्णय घेतले तर चांगले परिणाम समोर येतील. प्रवास टाळायला हवा. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ कठीण आहे आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, तर जीवनात सुधारणा होतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या गोष्टीवरून नाराज राहाल आणि मनाला त्रास होईल.
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नवीन प्रकल्प लाभदायक
हा आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑफिस आणि व्यवसायाच्या कामात प्रगती होईल तसेच तुमचा मान-सम्मान वाढेल. या आठवड्यात सुरू केलेला नवीन प्रकल्प तुम्हाला खूप मोठा लाभ देणार आहे. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा आहे. आर्थिक खर्च जास्त होऊ शकतात त्यामुळे बजेट कोलमडेल. कुटुंबाच्या बाबतीत काही निर्णय योग्य ठरतील पण काही निर्णयामुळे तुम्हाला नाराजी सहन करावी लागेल. या आठवड्यात प्रवासामुळे यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात.
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थिती उत्तम
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून अनुकूल असेल तसेच धनलाभाचे उत्तम योग असतील. प्रवासामुळे तुमचा लाभ होईल. तुम्हाला एखादा नवा प्रोजेक्ट शुभसंयोग घेऊन येत आहे. तुम्ही घेतलेले कष्ट अखेरीस शुभवार्ता घेऊन येतील. आर्थिक विषयात एखादी नवी गुंतवणूक तुमच्यासाठी कष्ट वाढवू शकते. प्रवासातून साधरण यश मिळेल, त्यामुळे प्रवास टाळला तर उत्तम राहील. आठवड्याच्या अखेरीस ताळमेळ ठेवून पुढे जा, त्यातून चांगेल परिणाम मिळतील.
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कुटुंबात निष्काळजीपणा नको
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती आहे तसेच जेवढे जास्त लक्ष केंद्रित करून काम कराल, तितके अधिक यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत वेळ उत्तम आहे. नवीन काहीतरी शिकून त्यावर अंमलबजावणी केली तर चांगले परिणाम मिळतील. गुंतवणुकीवर अंमलबाजवणी करताना चांगले परिणाम समोर येतील. प्रकृतीत बरीच सुधारणा होईल. कुटुंबात निष्काळजीपणा करू नका, तरच सुखद अनुभव राहतील आणि प्रेम दृढ होईल.आठवड्याच्या अखेरीस नवी सुरुवात तुमच्या जीवनात सौहार्द घेऊन येईल.
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : धनलाभाचे योग
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून चांगला आहे तसेच गुंतवणुकीच्या पॅटर्नमध्ये मोठे बदल करणारा असेल. आर्थिक विषयांत अनुकूल राहील आणि धनलाभाचे शुभसंयोग बनत जातील. जुन्या आठवणी ताज्या होतील. कार्यक्षेत्रात सुधारणा होईल. प्रवासातून शुभसंयोग बनत जातील, तुमच्या कष्टाच्या बळावर प्रवास सुखद होतील. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या गोष्टीवरून मन त्रस्त राहील. कोणत्याही यशाची अपेक्षा करत असाल तर त्याला अधिक वेळ लागणार आहे.
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कुटुंबात सुखसमृद्धी कायम राहील
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभलाभाचा आहे. तुम्हाला नशिबाची साथ राहील. एखाद्या नव्या प्रोजेक्टकडे तुमचे लक्ष जाईल. या आठवड्यात तुम्ही कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवास करू शकाल. एखाद्या ज्येष्ठाच्या आशीर्वादाने जीवनात सुखद अनुभव येतील. कुटुंबात सुखसमृद्धीचे शुभ संयोग बनत आहेत, आणि आपापसांतील प्रेम दृढ होईल. या आठवड्यात प्रवास टाळणे योग्य होईल. प्रवासादरम्यान एखाद्या महिलेमुळे मन चिंतेत राहील. या आठवड्यात प्रकृतीकडे दुलर्क्ष झाले तर समस्या उद्भवतील. आठवड्याच्या अखेरीस सुखसमृद्धीचे योग आहेत.
तुळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात संवादातून यश
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती आहे. एखाद्या तरुणाच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धीचे योग आहेत. आर्थिक विषयांत तुम्ही फार व्यस्त असाल. या आठवड्यात प्रवासात तुम्हाला फार संयम ठेवावा लागेल. जीवनात सुखसमृद्धीचे मार्ग खुले होतील. कार्यक्षेत्रात संवादातून विषय सोडवण्याचा प्रयत्न करा, तरच चांगले परिणाम समोर येतील. कुटुंबात तुम्हाला जोखीम पत्करून काही निर्णय घ्यावे लागतील तरच सुखद अनुभव मिळतील. या आठवड्यात प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. आठवड्याच्या अखेरीस कुटुंबासासाठी खूप धावपळ करावी लागेल.
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : खर्च वाढणार, प्रवास टाळा
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून प्रत्येक कामात यश आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही एखादा नवीन प्रकल्प हाती घेणार आहात त्यात यश मिळेल. आर्थिक विषयात या आठवड्यात खर्च अधिक राहतील, तुमच्या कोणत्या तरी दोन गुंतवणुकी चिंतेचा विषय ठरतील. या आठवड्यात प्रवास टाळावा, प्रवासामुळे निराशा येवू शकते. आठवड्याच्या शेवटी सुधारणा दिसून येईल.
धनु साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : सुखसमृद्धीचे शुभयोग, अहंकार बाजूला ठेवा
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून व्यवसायात उत्तम यश आहे. गुंतवणुकीत तुम्ही जेवढे लक्ष द्याला तेवढे चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील एखाद्या महिलेच्या मदतीने जीवनात सुखसमृद्धीचे शुभयोग बनत आहेत. या आठवड्यात प्रवासातून तुम्हाला रिलॅक्स वाटेल. कार्यक्षेत्रात अहंकारामुळे संघर्ष होणार नाही, याची काळजी घ्या. या आठवड्यात तुमच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या अखेरीस मन प्रसन्न राहील.
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक बाबतीत तणाव वाढणार
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे. ऑफिसच्या कामात लक्ष देवून काम केल तर उत्तम परिणाम दिसेल. आर्थिक बाबतीत तणाव वाढू शकतो आणि कुठूनतरी फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रवासातून शुभसंकेत आहेत, आणि प्रवास यशस्वी होतील. कुटुंबात सुखद अनुभव मिळतील. आठवड्याच्या अखेरीस कामे होतील आणि वेळ अनुकूल असेल.
कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवासाने समाधान, खर्च जास्त होणार
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती देणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रगतीच्या मार्गावरून पुढे जाणार आहात त्यामुळे मन प्रसन्न राहील. या आठवड्यातील प्रवासामुळे समाधान लाभेल, प्रियजनांसोबत केलेल्या प्रवासातून गोड स्मृती राहतील. स्वतःच्या पातळीवर निष्काळजीपणा ठेऊ नका. आर्थिक खर्च तुमच्या हातून जास्त होतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे हे खर्च जास्त होतील. कुटुंबातील एखाद्या युवकाचे मन अशांत राहील. आठवड्याच्या अखेरीस सुखसमृद्धीचे शुभ संयोग बनतील.
मीन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवास करणे टाळा, प्रोजेक्टबद्दल नाराजी
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती पहायला मिळेल तसेच नवीन गुंतवणुकीमुळे फायदे होतील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे निश्चित कराल. कार्यक्षेत्रात मात्र हातातील प्रोजेक्टबद्दल नाराजी राहील. आर्थिक विषयात वेळ प्रतिकूल राहील आणि युवकांचे खर्च जास्त होतील. प्रवास करणे टाळावे. आठवड्याच्या अखेरीस मन प्रसन्न राहील, प्रियजनांसोबत वेळ व्यतीत करणार आहात.