Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vastu Tips : नवीन घरात काहीच चांगलं होत नाही ! नकारात्मक ऊर्जा आहे का? वास्तुशास्त्राचे हे उपाय करा !
Vastu Tips For New Home: एखादी व्यक्ती कठोर परिश्रम घेवून घर बांधते किंवा घर खरेदी करते. घर मग ते लहान असो वा मोठे आपल्या कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी महत्त्वाचे असते. पण कधी कधी तुम्ही पाहिलं असेल नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये रोज नवीन समस्यांचा सामना करावा लागतो.नातेवाईकांशी वाद, कामे होत नाही, अचानक अडचणी येतात, कुटुंबात सतत वादविवाद होतात. याचे कारण वास्तुदोष असू शकतो. नवीन घरातील वास्तूदोष कसा कमी करावा त्यासाठी पाहूया काही उपाय
या उपायाने नवीन घराचा वास्तुदोष होईल दूर
वास्तु शास्त्रानुसार, नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच कुटुंबातील कोणीतरी आजारी पडले आणि आजार खूप दिवस राहीला तर गुळाचे दान करा आणि सर्व कुटुंबाला गुळ खाण्यासाठी द्या, असे केल्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो. जर नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये हवा व्यवस्थितपणे येत नसेल तर घरात दमटपणा निर्माण होतो, हा एक वास्तुदोष आहे. त्यासाठी तुम्ही पांढऱ्या वस्तू जसे दूध, साखर, तांदूळ, कापूर यांचे दान करा.
या उपायाने प्रत्येक कामात मिळेल नशिबाची साथ
नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला असे वाटले की काहीतरी गडबड होते आहे. किंवा अचानक अडचणींचा डोंगर उभा राहतो आहे तर घरात पिवळ्या रंगाचे पडदे वापरा. तसेच, संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडा. गुरु ग्रहाच्या आशिर्वादाने घरातील अडचण कमी होईल तसेच तुमच्या जन्मकुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होईल. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल.
या उपायाने घरात सुख-शांती नांदेल
सकाळची सूर्याची किरणे घरात येणे शुभ मानले जाते, पण तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल, फ्लॅटमध्ये अंधार असेल तर घरात वास्तुदोष आहे असे समजायला हवे. अशा घरात आजारपण, दुर्दैव यांचा निवास असतो. यासाठी रात्री लाल मसूराची डाळ घराच्या चारही कोपऱ्यात पसरवा आणि सकाळी उठून ती बाहेर फेकून द्या. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होवून घरात सुख-शांती कायम राहते.
या उपायाने घरातील आजारपण होईल दूर
घरात वारंवार सीलनची समस्या असेल, काही कारणाने भींतीमध्ये ओलावा धरत असेल तर घरात श्वसनाच्या समस्या किंवा अस्थमा सारखे आजार होवू शकतात. यावर उपाय म्हणून सोमवारी खीरीचा नैवेद्य देवाला अर्पण करा आणि सर्वांना खीर प्रसाद म्हणून द्या. असे केल्यामुळे वास्तुदोष दूर होईल
या उपायाने वादविवादापासून मिळेल मुक्ती
नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच नातेवाईकांशी वादविवाद होऊ लागल्यास, तांब्याची नाणी दान करा किंवा तांब्याचे नाणे नारळासोबत प्रवाहीत पाण्यात सोडून द्या. शक्य झाल्यास एखादा धार्मिक ग्रंथ दान करावा. असे केल्यामुळे वास्तुदोष दूर होईल आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहतील. समजा मुलं तुमचं बोलणं ऐकत नसतील किंवा शिक्षणावर लक्ष केंद्रित करत नसतील, तर तांब्यावर तयार केलेले सूर्य यंत्र मुख्य दरवाज्यावर लावा किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि त्याची पूजा करा.
या उपायाने आर्थिक समस्यांपासून होईल सुटका
नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, किंवा अचानक नोकरीत समस्या येत असेल, तर तिळाच्या तेलाचे दान करा आणि शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाचा दिवा प्रज्वलित करा. असे केल्यामुळे वास्तूदोष कमी होवून तुमच्या जीवनातील समस्या कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.