Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pushpa 2 Box Office Collection Day 8 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाचं आठव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 ने नवव्या दिवशी २७.५ कोटींची कमाई केलीये. यानंतर आता भारतात पुष्पा 2 ची एकूण कमाई ७५० कोटींच्या पुढे गेली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे जगभरात बॉक्स ऑफिस कलेक्शन १०८० कोटींच्या आसपास पोहोचले आहे.मात्र, हे सिनेमाच्या कलेक्शनचे अंदाजे आकडे असून ते बदलण्याची शक्यता आहे.
पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी
गेल्या आठ दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी १७४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ११९.२५ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी कमाई १४१.०५ कोटींवर पोहोचली आहे. पाचव्या दिवशी कलेक्शन ६४.४५ कोटी होतं. चित्रपटाने सहाव्या दिवशी ५१.५५ कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाने सातव्या दिवशी ४३.३५ कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी चित्रपटाचा आकडा २७.५ कोटींवर पोहोचलाय. ‘अभिनेत्री असताना हा सन्मान मिळणं दुर्मिळ’ मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता माळी भावुक
आठ दिवसात या सिनेमाने ७२६ कोटी २५ लाखांचं कलेक्शन केलं असून त्यापैकी तेलुगूमध्ये २४१ कोटी, हिंदीमध्ये ४२५.६ कोटी, तमिळमध्ये ४१ कोटी, कन्नडमध्ये ५.३५ कोटी आणि मल्याळममध्ये १२.४ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडला हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या वीकेंडला हा चित्रपट १५०० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. तर चित्रपटाने आधीच ५०० कोटी रुपयांचे बजेट वसूल केले आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन प्रत्येक दिवसागणिक विक्रम मोडत आहे.