Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक अंकशास्त्र, 16 डिसेंबर To 22 डिसेंबर 2024 : मूलांक 4 यशाच्या दिशेने वाटचाल ! मूलांक 9 साठी धनलाभाचे योग ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Weekly Numerology Prediction 16 December To 22 December 2024 : डिसेंबर महिन्याचा हा तिसरा आठवडा आहे. डिसेंबरच्या या आठवड्यात वाशी योग तयार होतो आहे. या आठवड्यात सूर्य धनु राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे वाशी योग निर्माण होईल. त्याचा सर्व मूलांकावर कमी जास्त परिणाम दिसून येणार आहे. काही मूलांकांना धनलाभ तर काहीजणांचे टेन्शन वाढणार आहे. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.
मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग
या आठवड्यात कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग बनत आहेत, पण आज काही कारणांमुळे तुमचे मन चिंतेत असेल. आर्थिक बाबतीत धनलाभाची प्रबळ स्थिती बनत आहे, तसेच गुंतवणुकीतील यशामुळे तुमचे मन समाधानी राहील. प्रेमसंबंधात आपापसांतील संबंध दृढ होतील आणि जीवन रोमँटिक राहील. आठवड्याच्या अखेरीस संवादातून समस्या सोडवणे तुमच्यासाठी चांगले परिणाम घेऊन येईल.
मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): प्रोजेक्टमुळे टेन्शन वाढेल
हा आठवडा आर्थिक बाबतीत वेळ कष्टदायक राहील आणि गुंतवणुकीच्या बाबतीत तुमच्यावर काही बंधने येतील. कार्यक्षेत्रातील काही प्रोजेक्टमुळे मन चिंतेत राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या इच्छेनुसार बदल होण्यास मात्र वेळ लागणार आहे. प्रेमसंबंधात भावनित पातळीवर वेळ कठीण आहे, आणि आपापसांत मतभेद होऊ शकतात. आठवड्याच्या अखेरीस जीवनात हळूहळू बदल होताना दिसतील.
मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): गुंतवणुकीतून लाभ
हा आठवडा आर्थिक बाबतीत या आठवडा चांगला राहील आणि धनलाभाचे सुंदर योग बनत आहेत. गुंतवणुकीतून तुम्हाला यश मिळेल. प्रेमजीवनात आपापसांतील संबंध दृढ होतील, तसेच जोडीदाराचे सानिध्यही लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टमध्ये काही नुकसान होऊ शकते, याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या अखेरसी अहंकारामुळे संघर्ष होऊ निर्माण होईल.
मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): सफलतेच्या दिशेने पुढे
हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून सरस आहे आणि धनलाभाचे योग आहेत. प्रत्येक कामात मित्रांची मदत मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल, तसेच तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींवर उपाययोजना करून सफलतेच्या दिशेने पुढे जाल. प्रेमजीवनात आनंददायी वातावरण राहील. आठवड्याच्या अखेरीस प्रेम दृढ होत जाईल. तसेच ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात सुखसमृद्धीचे संयोग साकारतील.
मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): गुंतवणुकीकडे लक्ष द्या
हा आठवडा तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात प्रगती होईल, तसेच नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून चांगल्या भविष्यासाठी प्लॅनिंग करू शकाल. आर्थिक बाबतींचा विचार करता भावनिक दृष्टिकोनातून खर्च जास्त होतील, त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम हळूहळू वाढत जाईल. आठवड्याच्या अखेरीस जीवनात एकटेपणा जानवेल आणि मन अस्वस्थ होईल.
मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): नवीन प्रोजेक्टमुळे मन प्रसन्न
हा आठवडा आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील आणि धनलाभाची प्रबळ परिस्थिती बनत आहे. गुंतवणुकीतून लाभ होतील. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम दृढ होतील, तसेच प्रेमजीवनातील कोणतेही दोन निर्णय तुम्हाला आकर्षक वाटतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि नवीन प्रोजेक्टमुळे मन संतुष्ट राहील. आठवड्याच्या अखेरीस वेळ अधिक अनुकूल होईल आणि तुम्ही चांगल्या भविष्याच्या दिशेने प्रगती कराल.
मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५):कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती
हा आठवडा लवलाइफसाठी उत्तम आहे. कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती होणार आहे . नव्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही यशाच्या दिशेने हळूहळू प्रगती कराल. आर्थिक बाबतीत सांभाळून राहा, कारण खर्च अधिक होऊ शकतात. आठवड्याच्या अखेरीस वेळ अनुकूल होत जाईल आणि सुखसमृद्धीचे योग बनत जातील.
मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): कार्यक्षेत्रात प्रगती
हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती होईल, तसेच तुमचे प्रोजेक्ट तुमच्या नियंत्रणात राहतील. आर्थिक विषयांत खर्च अधिक होतील. विशेषतः भावनिक कारणांमुळे खर्च अधिक होतील. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम दृढ होत जाईल आणि प्रेमजीवनात आनंदाचे वातावरण राहील. या आठवड्यात जीवनात तुम्ही बऱ्याच बदलांचा अनुभव घ्याल आणि जीवनात एका नव्या उद्देशाच्या दिशेने मार्गक्रमणाचा विचार पक्का कराल.
मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): धनलाभाचे योग
हा आठवडा आर्थिक विषायांत आठवडा शुभ आहे आणि धनलाभाचे प्रबळ योग बनत आहेत. कार्यक्षेत्रात मन अस्वस्थ राहील आणि आठवड्यात तुमच्या हातातील कामात अंहकार आड येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधात वरवर सर्व काही ठीक राहील, तसेच प्रेमजीवनात सुखद अनुभव राहतील. आठवड्याच्या अखेरीस वेळ अनुकूल होत जाईल आणि जीवनात सुखसमृद्धीचे शुभ योग बनत आहेत.