Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

6

Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाचं ११व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुन स्टारर बहुचर्चित सिनेमा ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला चालतोय आणि त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी झालेला नाही. या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी त्याची किंमत वसूल केली होती आणि आता तो प्रचंड नफा कमावत आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ने रिलीजच्या ११व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी किती कलेक्शन केलं आहे? ते जाणून घेऊया.

‘पुष्पा 2: द रुल’ ने ११व्या दिवशी किती कमाई केली?

‘पुष्पा 2: द रुल’ रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात आहे आणि त्याची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने प्रचंड कमाई केली नाही तर दुसऱ्या आठवड्यामध्येही या ॲक्शन थ्रिलरने धमाल केली. दुसऱ्या शनिवारीही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या रविवारीही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आले होते. यासोबतच ‘पुष्पा 2: द रुल’नेही दुसऱ्या वीकेंडला धुमाकूळ घातलाय.
Ustad Zakir Hussain Passed Away : उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड, कुटुंबीयांनी दिलं निधनाचं वृत्त
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, ‘पुष्पा 2: द रुल’ने पहिल्या आठवड्यात ७२५ कोटी ८ लाखांची कोटींची कमाई केली आहे. ९व्या दिवशी चित्रपटाने ३६ कोटी ४ लाखांची कमाई केली, तर १०व्या दिवशी ‘पुष्पा 2: द रुल’चं कलेक्शन ६३.३ कोटी रुपये होतं. आता चित्रपटाच्या ११व्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

झुकेगा नहीं साला! पुष्पा राजचं फ्याड जाईना; ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ ने रिलीजच्या ११व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यांसह, ‘पुष्पा 2: द रुल’चे ११ दिवसांचं एकूण कलेक्शन आता ९०० कोटींवर पोहोचलं आहे. रिलीजच्या ११ दिवसांत, चित्रपटाने तेलगूमध्ये २७९.३५ कोटी रुपये, हिंदीमध्ये ५५३.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ४८.१ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.५५ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.४ कोटी रुपये कमावले आहेत.
हे सुंदर क्षण…. झाकीर हुसेन यांची ती पोस्ट ठरली अखेरची, भारताने हिरा गमवल्याचे चाहत्यांचे म्हणणे

‘पुष्पा 2: द रुल’ ने यशच्या KGF 2 चा रेकॉर्ड मोडला

‘पुष्पा 2: द रुल’ने दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या ११ दिवसांत विक्रमी ९००.५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF चॅप्टर 2’ च्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.