Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 18 डिसेंबर 2024: नवीन गोष्टी शिकण्याची संधी ! अती विचार तब्येतीसाठी घातक ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 18 December 2024 : 18 डिसेंबर, संकष्ट चतुर्थी असल्यामुळे सगळ्या मूलांकावर गणपती बाप्पाचा आशिर्वाद राहील. मूलांक 1 असणाऱ्यांनी कामात फोकस ठेवा तर मूलांक 3 च्या जातकांची ठरवलेली कामे होतील. मूलांक 5 साठी लवलाइफमध्ये तणावाची शक्यता तर मूलांक 7 च्या लोकांनी सावध राहून काम करा. मूलांक 9 असणाऱ्यांसाठी दिवस ठिक असून जोडीदाराकडून मदत मिळेल. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – कामात फोकस ठेवा
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक असून कामामध्ये फोकस महत्त्वाचा आहे. मेहनत करण्याची तुमची सवय फायदा करून देईल. व्यवसायात प्रगती आणि आर्थिक स्थिती ठिक असेल.
मूलांक 2 – नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक असून लोकांशी अधिक चांगला संवाद साधाल. मित्रांकडून कामात मदत आणि त्यामुळे दुप्पट फायदा होईल. काही नवीन गोष्टी शिकण्याचे संधी मिळू शकते.
मूलांक 3 – ठरवलेली कामे होणार
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून ठरवलेली सगळी कामे होतील. इच्छांची पूर्तता झाल्याने समाधान मिळेल. व्यवसायात फायदा असून आर्थिक स्थिती उत्तम असेल.
मूलांक 4 – कामात बदल होतील
मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक असून अनेक कामात मोठा बदल पहायला मिळेल. इतरांच्या कामांमुळे तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कामे थोडे वाढेल. आर्थिक स्थिती ठिक असेल.
मूलांक 5 – लवलाइफमध्ये तणावाची शक्यता
मूलांक 5 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. लवलाइफमध्ये थोडा तणाव असेल तो संवादाने सोडवू शकता. जुना मित्र मदत करेल त्यामुळे कामे मार्गी लागतील. आवडच्या गोष्टी करायची संधी मिळू शकते.
मूलांक 6 – कुटुंबातील सदस्यांचा हस्तक्षेप त्रासदायक
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक नाही, कुटुंबातील सदस्यांचा हस्तक्षेप त्रासदायक ठरू शकतो. काहीचे बोलणे तुमच्या मनाला लागेल. अधिक विचार कराल तर त्रास वाढेल त्यापेक्षा स्वतःमध्येच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 7 – सावध राहून काम करा
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक असून थोडं सावध राहून काम करा, घाईघाईत केलेल्या कामामुळे कामे अपूर्ण राहू शकतात. मेहनतीचे फळ मिळेल. आज विरोधर आणि प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.
मूलांक 8 – इतरांच्या मतांचा विचार करा
मूलांक 8 साठी आजचा दिवस ठिक नाही. तुमचे वागणे किंवा बोलणे लोकांना आवडणार नाही. इतरांची मते तुमच्या कामात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती ठिक असेल.
मूलांक 9 – जोडीदाराकडून मदत मिळेल
मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक असून तुमची विचारधारा आर्थिक स्थितीवर जास्त फोकस करेल. जोडीदाराकडून प्रत्येक कामात साथ मिळेल. कामे वाढत आहेत तुम्ही नियोजनाकडे लक्ष द्या.