Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Cancer Horoscope 2025 : राहूचा प्रभाव कायम! आर्थिक बजेट कोलमडणार, आरोग्याची काळजी घ्या, कसे असेल कर्क राशीसाठी नवीन वर्ष
Cancer Horoscope 2025 In marathi : ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात कर्क राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून आराम मिळणार आहे. या वर्षी शनि २९ मार्चला नवव्या घरात प्रवेश करेल. तर शनीच्या अष्टमाधेयचा प्रभाव मार्च महिन्यापर्यंत तुमच्यावर राहिल. ग्रहांच्या हालचालीमुळे कर्क राशीच्या लोकांना नवीन वर्ष आर्थिक, वैवाहिक दृष्टीतून कसे असेल जाणून घेऊया.
Kark Rashifal 2025 In Marathi :
ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात कर्क राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून आराम मिळणार आहे. या वर्षी शनि २९ मार्चला नवव्या घरात प्रवेश करेल. तर शनीच्या अष्टमाधेयचा प्रभाव मार्च महिन्यापर्यंत तुमच्यावर राहिल.
१४ मे पर्यंत गुरुचे संक्रमण कर्क राशीत अकराव्या स्थानात असेल. १४ मे नंतर गुरु बाराव्या स्थानात प्रवेश करेल. जे अनुकूल नसले तरी परिणाम चांगले देईल. घरातील शुभ कार्यावर तुम्ही पैसे खर्च करा. वर्षाच्या शेवटी गुरु कर्क राशीत असल्यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थयात्रा होण्याची शक्यता आहे. राहू कर्क राशीत आठव्या भावात असेल त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. ग्रहांच्या हालचालीमुळे कर्क राशीच्या लोकांना नवीन वर्ष आर्थिक, वैवाहिक दृष्टीतून कसे असेल जाणून घेऊया.
कर्क राशी २०२५ आरोग्य:
नवीन वर्षात तुमचे आरोग्य संमिश्र असणार आहे. एप्रिल ते मे हा काळ तुमच्या आरोग्यासाठी चांगला राहील. तुमच्या यावेळी शनीच्या प्रभावातून मुक्त व्हाल. राहूचा तुमच्यावर अनुकूल प्रभाव राहाणार आहे. जून महिन्यात आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. संसर्गाचे आजार जडतील. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क राशी २०२५ करिअर :
कर्क राशीच्या लोकांना २०२५ चे वर्ष नोकरी, व्यवसायात अनुकूल असेल. या वर्षी तुम्हाला नोकरीत बढती मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढतील. पगार वाढल्याने तुम्ही आनंदी असाल. या वर्षी तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न केल्यास वर्षाच्या शेवटी तुम्हाला यश मिळेल. तांत्रिक क्षेत्रातील तुमचे ज्ञान आणि अनुभव वाढेल. तांत्रिक क्षेत्रात अधिक प्रगती कराल. व्यवसायात यश मिळेल.
कर्क राशी २०२५ आर्थिक राशीफल :
आर्थिक बाबतीत २०२५ चे वर्ष कर्क राशीसाठी खर्चिक असेल. तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. ज्यामुळे तुमचा आर्थिक बजेट बिघडू शकतो. जोखमीची गुंतवणूक करणे टाळा. शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामानाची काळजी घ्या. बांधकामावर पैसे खर्च होतील.
कर्क राशी २०२५ वैवाहिक जीवन
कर्क राशीसाठी हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र असेल. वैवाहिक जीवनात परस्पर वाद होतील. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील. यावर्षी तुम्ही प्रेम जीवनात काही धाडसी निर्णय घेऊ शकता.
कर्क राशी २०२५ उपाय
- यावर्षी तुम्हाला राहूच्या उपायांची विशेष काळजी घ्यावी लागेल. राहू तुमच्यासाठी विशेषत: प्रतिकूल असेल. जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडतील.
- राहूकाळ दरम्यान ओम रा रहवे नमः करावा.
- दुर्गा सप्तशतीचे पठण करा .
- प्रत्येक सोमवारी भगवान शिवाचा अभिषेक करावा.
- सात मुखी रुद्राक्ष धारण केल्यास लाभ होईल.