Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Leo Horoscope 2025 : शनिची साडेसाती त्रासदायक! प्रमोशन- इंक्रीमेंट होईल, आरोग्याबाबत सर्तक राहा, कसे असेल सिंह राशीसाठी नवीन वर्ष
Leo Horoscope 2025 In marathi : ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीसाठी नवीन वर्ष संमिश्र असणार आहे. यावर्षी गुरु १४ मे पर्यंत दहव्या स्थानात आणि त्यानंतर अकराव्या स्थानात प्रवेश करेल. वर्षाच्या शेवटी गुरु सिंह राशीच्या बाराव्या स्थानात जाणार आहे. २०२५ चे नवीन वर्ष सिंह राशीसाठी करिअर, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनासाठी कसे असेल जाणून घ्या.
Singh Rashifal 2025 In Marathi :
ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीसाठी नवीन वर्ष संमिश्र असणार आहे. यावर्षी गुरु १४ मे पर्यंत दहव्या स्थानात आणि त्यानंतर अकराव्या स्थानात प्रवेश करेल. वर्षाच्या शेवटी गुरु सिंह राशीच्या बाराव्या स्थानात जाणार आहे.
ग्रहांच्या हालचालीमुळे या वर्षी तुम्हाला शुभ कार्याच्या संधी मिळतील. तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. चांगली वेतनवाढ मिळेल. परंतु, शनिच्या संक्रमणामुळे काही गोष्टी अनुकूल होणार नाही. एप्रिल महिन्यापासून शनि तुमच्या राशीत आठव्या स्थानात असणार आहे. तुम्हाला त्याचे फळ मिळण्यास सुरु होईल.
राहू या वर्षी आठव्या स्थानातून वक्री होऊन सातव्या भावात येईल. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल. अनावश्यक खर्च कमी होतील. वैवाहिक जीवन आणि कुटुंबात काही तणाव निर्माण होईल. २०२५ चे नवीन वर्ष सिंह राशीसाठी करिअर, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनासाठी कसे असेल जाणून घ्या.
सिंह राशी २०२५ आरोग्य –
सिंह राशीच्या लोकांना आरोग्याबाबत अधिक जागरुक आणि सतर्क राहावे लागणार आहे. शनिच्या साडेसातीमुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. अनेक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. वाहन आणि मशीनचा वापर जपून करा. पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. योगसाधना करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
सिंह राशी २०२५ करिअर-
नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र राहाणार आहे. या वर्षी तुम्हाला कामात अधिक सावध आणि सतर्क राहावे लागेल. तुमची पदोन्नती होईल. नोकरीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी समन्वय राखा. मतभेद आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना या वर्षी व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. अनेक तांत्रिक समस्या आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. वागण्यात आणि बोलण्यात गोडवा ठेवा.
सिंह राशी २०२५ आर्थिक स्थिती-
नवीन वर्ष तुमच्यासाठी आर्थिक बाबींमध्ये संघर्षानंतर लाभदायक ठरेल. तुमचे अनावश्यक खर्च कमी होतील. शुभ कामांवर पैसे खर्च कराल. घरबांधणी किंवा मालमत्तेवर पैसे खर्च करु शकता. न्यायालयीन प्रकरणांपासून दूर राहावे लागेल. तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला लोभ आणि मोह टाळावा लागेल, अन्यथा नुकसान होईल. जोखमीच्या गुंतवणुकीतून दूर राहा.
सिंह राशी २०२५ प्रेमभविष्य-
सिंह राशीसाठी हे वर्ष प्रेम आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत संमिश्र असणार आहे. जोडीदाराशी काही मुद्द्यावर मतभेद होतील. नातेसंबंध सुधारतील. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. मे नंतरचा काळ तणाव वाढवेल. प्रेमसंबंधात तीव्रता राहिल. प्रेमसंबंधांचे वैवाहिक नात्यात रुपांतर होईल. तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात शुभ कार्य घडतील.
सिंह राशी २०२५ उपाय
सिंह राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे. जो ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तुम्हाला सूर्याला प्रसन्न ठेवावे लागेल. नियमितपणे सूर्याची उपासना करा. शनिच्या प्रभावाखाली असल्यामुळे आणि राहू सप्तमात असल्याने प्रतिकूल परिणाम मिळतील.
- उगवत्या सूर्याला कुंकुमिश्रित पाण्याने नियमित अर्घ्य द्यावे.
- दर रविवारी सूर्य पुराणाचे पठण करा.
- सात मुखी किंवा आठ मुखी रुद्राक्ष धारण केल्यानेही लाभ मिळतील.
- शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे आणि खिचडी खाणे फायदेशीर ठरेल.