Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….
Pushpa 2 Box Office Collection: सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पुष्पा २- द रुल’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसरा चित्रपट ठरला आहे, ज्याने १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या १६ दिवसांत ही कामगिरी केली आहे.
हायलाइट्स:
- ‘पुष्पा २’ हा देशातील १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा दुसरा चित्रपट
- रविवारी दोन दिवसांनंतर ‘पुष्पा २’ नवा इतिहास रचणार
- ख्रिसमसला ‘बेबी जॉन’ येतोय, ‘पुष्पा २’ला अडथळा?
हे जरा अती झालं! TRP साठी लहान मुलांसोबत तसले सीन नको, ‘अप्पी आमची…’ च्या चालू ट्रॅकवर प्रेक्षकांचा राग
‘पुष्पा २’ इतिहास रचण्यापासून फक्त २६ कोटी दूर
विशेष बाब म्हणजे ‘पुष्पा २’ आता देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमाच्या रेकॉर्डपेक्षा केवळ २६.०७ कोटी रुपये दूर आहे. सात वर्षांपूर्वी ‘बाहुबली २’ ने १०३०.४२ कोटींची संपुर्ण कमाई करून हा विक्रम केला होता. अल्लू अर्जुनचा चित्रपट रविवारी हा विक्रम सहज पार करेल आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहासही रचेल हे निश्चित झाले आहे.
‘पुष्पा २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
sacnilk च्या अहवालानुसार, पहिल्या आठवड्यात ७२५.८० कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात २६४.८० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, तिसऱ्या शुक्रवारी ‘पुष्पा २’ ने देशात १३.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गुरुवारी सिनेमाने १७.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. कमाईत -२२% ची घट झाली आहे. मात्र आता शनिवार आणि रविवारी पुन्हा कमाई वाढण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने हिंदीत ११ कोटी रुपये, तेलुगूमधून २.४० कोटी रुपये, तामिळमध्ये ३० लाख रुपये, कन्नडमधून ३ लाख रुपये आणि मल्याळममधून २ लाख रुपयांचा सर्वाधिक व्यवसाय केला आहे.
कट्टा म्हणजे माहित आहे का? लग्नापूर्वी गौरी खानच्या भावाने शाहरुखला दिलेली धमकी, हे होते अभिनेत्याचे उत्तर
देशात १६ दिवसात ‘पुष्पा २’ चे नेट कलेक्शन- १००४.३५ कोटी रु
हिंदीमध्ये नेट कलेक्शन – ६३२.६० कोटी
तेलगू नेट कलेक्शन- २९७.८० कोटी रु
तामिळमध्ये नेट कलेक्शन – रु ५२.८० कोटी*
मल्याळममध्ये नेट कलेक्शन – रु. १३.९९ कोटी*
कन्नडमधून नेट कलेक्शन – ७.१६ कोटी*
देशात १६ दिवसात ‘पुष्पा २’ चे एकूण कलेक्शन – १२०८.०० कोटी रु
‘पुष्पा २’ चे परदेशात एकूण कलेक्शन – २३७.०० कोटी रु
‘पुष्पा २’ चे जागतिक एकूण कलेक्शन – १४४५.०० कोटी
पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….
‘पुष्पा २’ जगभरातील कलेक्शन
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर १६ दिवसांत सुमारे १४४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सध्या जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल ‘बाहुबली २’ १७८८.०६ कोटी रुपयांवर नंबर आहे, तर सर्वात वर आमिर खानचा ‘दंगल’ आहे, ज्याने २०७०.३० कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘बेबी जॉन’ मुळे ‘पुष्पा २’ धोका?
बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या ‘पुष्पा २’साठी ‘बेबी जॉन’ ४ दिवसांनंतर अडचणी निर्माण करु शकतो. वरुण धवनचा हा ॲक्शन चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. ॲटलीच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाबाबत बरीच चर्चा निर्माण झाली आहे. ‘पुष्पा २’ याला बळी पडतो की त्याची जादू कायम राहते हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.