Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Weekly Lucky Zodiac Sign 23 to 29 December 2024 : शश राजयोग! तुळसह ५ राशी होणार मालामाल, वाचा साप्ताहिक लकी राशीभविष्य
Weekly Lucky Zodiacs 23 to 29 December Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरच्या या आठवड्यात शश राजयोग तयार होणार आहे. शनि स्व:राशीत म्हणजे कुंभ राशीत असल्याने हा राजयोग तयार होईल. डिसेंबरच्या या आठवड्यात शनिदेव तुळसह ५ राशींना लकी ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरच्या या आठवड्यात शश राजयोग तयार होणार आहे. शनि स्व:राशीत म्हणजे कुंभ राशीत असल्याने हा राजयोग तयार होईल. डिसेंबरच्या या आठवड्यात शनिदेव तुळसह ५ राशींना लकी ठरणार आहे.
काही राशींचा विकास आणि लाभ होईल. तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तुमचे कोणतेही अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या राशी लकी ठरणार आहेत त्यांच्याविषयी
वृषभ साप्ताहिक लकी राशीभविष्य
वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात सपंत्तीच्या बाबतीत फायदा होणार आहे. करिअर आणि व्यवसायासंबंधित तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल. प्रवासादरम्यान प्रभावशाली लोक भेटतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. तुमचे संबंध सुधारतील.
मिथुन साप्ताहिक लकी राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आणि भाग्यशाली असणार आहे. तुमची सर्वात मोठी इच्छा या काळात पूर्ण होईल. बचत करण्याचा मार्ग सापडेल. कामाच्या ठिकाणी ज्या गोष्टींची काळजी होती ती लवकरच दूर होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. लव्ह लाईफमध्ये जोडीदारासोबत संबंध सुधारतील. विवाहित लोक सुखी जीवन जगतील.
कर्क साप्ताहिक लकी राशीभविष्य
हा आठवडा कर्क राशीसाठी लकी असेल. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित लाभ होतील. ज्यामुळे यश मिळविणे सोपे होईल. या आठवड्यात तुमचे प्रमोशन देखील होणार आहे. सहकारी आणि मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी-विक्री कराल. राजकारणात आणि समाजात तुमचा मान वाढेल. कौटुंबिक जीवन संतुलित राहिल.
तुळ साप्ताहिक लकी राशीभविष्य
तुळ राशीच्या लोकांना या आठवड्यात थोडा विचार करावा लागणार आहे. झटपट नफा मिळवण्याच्या नादात नुकसान होऊ शकते. तुम्हाला बुद्धी आणि विवेकाचा वापर करावा लागेल. अशा लोकांपासून अंतर राखा, जे तुम्हाला ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुमचे मन अध्यात्माकडे अधिक राहिल. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाल. जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ साप्ताहिक लकी राशीभविष्य
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. या राशीच्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर परत मिळतील. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.