Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी
Pushpa 2 Box Office Record: अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रुल’ बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे! रिलीजच्या १७ व्या दिवशी, चित्रपटाने अंदाजे १०२९.९ कोटी रुपयांची कमाई करून ‘बाहुबली २’ च्या रेकॉर्डला आव्हान दिले आहे
हायलाइट्स:
- अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाने १७ व्या दिवशी बक्कळ कमाई केली
- ५ डिसेंबर रोजी रिलीज पुष्पा २ रिलीज झाला होता.
- १७व्या दिवशी ‘पुष्पा २’ ची कमाई किती?
पुष्पा २ मोडणार ७ वर्ष जुना मेगा रेकॉर्ड ! १००० कोटी क्लबमध्ये एण्ट्री करणारा दुसरा सिनेमा तर पहिला आहे….
‘पुष्पा २’ ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड?
सुमारे ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘पुष्पा २’ ने १७ व्या दिवशी पाच भाषांमध्ये सुमारे १०२९.९ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले. प्रभासच्या ‘बाहुबली २’ चा ७ वर्ष जुना रेकॉर्ड तोडण्यापासून तो काही पावले दूर आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एसएस राजामौलीच्या चित्रपटाने देशात १०३०.४२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
किती आहे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलची फी? मुलीच्या शिक्षणासाठी ऐश्वर्या-अभिषेक खर्च करतात इतके लाख
१७व्या दिवशी ‘पुष्पा २’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
Sacnik नुसार, ‘पुष्पा २’ ने तिसऱ्या शनिवारी म्हणजेच १७ व्या दिवशी एकूण २५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ज्यामध्ये तेलगूमध्ये सुमारे ४.३५ कोटी रुपये, हिंदीमध्ये २० कोटी रुपये, तामिळमध्ये ५५ लाख रुपये, कन्नडमध्ये ८ लाख रुपये आणि मल्याळममध्ये सुमारे २ लाख रुपये जमा झाले आहेत. या चित्रपटाने हिंदीत सर्वाधिक म्हणजे ६५२.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर तेलुगूमध्ये ३०२.३५ कोटी रुपये कमावले आहे.
अत्र तत्र पुष्पा २ चं सर्वत्र! १७ व्या दिवशी अल्लु अर्जुनच्या सिनेमाची छप्परफाड कमाई,कमावले इतके कोटी
‘पुष्पा २’ चे वर्ल्डवाइड कलेक्शन
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर, १६व्या दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर सिनेमाने १४३५.३० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले होते. मात्र, तो ‘दंगल’ पेक्षा अजूनही खूप मागे आहे कारण त्याची कमाई २०७०.३० कोटी रुपये होती. तर ‘बाहुबली २’ अद्याप या बाबतीत त्याला मागे टाकू शकला नाही कारण त्याचे जगभरात एकूण १७८८.०६ कोटी रुपये होते. १७ व्या दिवशी चित्रपटाने १४६५ कोटी रुपयांची कमाई केली होती.