Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pushpa 2 Box Office Collection Day 20 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाने २०व्या दिवशी किती कमाई केली आहे? जाणून घ्या.
पुष्पा राजची ‘फायर’ विझत चालली; सिनेमाची कमाई घटली, २० दिवसांनंतर गल्ल्यात किती कोटी?
पुष्पा २चं २०व्या दिवसाचं कलेक्शन
पुष्पा 2 च्या २० व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल सांगायचं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आतापर्यंत ७.८६ कोटी रुपये कमावले असून हे आकडे अजूनही अपडेट केले जात आहेत. रात्री ही संख्या वाढणार आहे. अंतिम डेटा सकाळीच अपडेट केला जातो. एवढ्या कलेक्शननंतर पुष्पा 2 चं कलेक्शन आता १०८३.४६ कोटी झालं आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री; साकारणार धमाकेदार भूमिका
तिसऱ्या आठवड्यात पुष्पा २ सिनेमाची उत्सुकता कमी झालीये. या चित्रपटाने शुक्रवारी १४ कोटी ३ लाख रुपये, शनिवारी २४ कोटी ७५ लाख रुपये, रविवारी ३२ कोटी ९५ लाख रुपये आणि सोमवारी १३ कोटी रुपये कमावले आहेत. ही आकडेवारी भारताची आहे. सिनेमाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाने १६०० कोटींचा आकडा पार केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता झळकतोय नाना पाटेकरांच्या सिनेमात; ‘वनवास’मधील भूमिकेचं होतंय कौतुक
पुष्पा 2 लवकरच KGF Chapter 2 च्या जागतिक कलेक्शनला भारतीय कलेक्शनमधून मागे टाकेल. दरम्यान, या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. अशातच पुष्पा २च्या भरगोस यशानंतर आता प्रेक्षकांना पुष्पाच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.