Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाने ख्रिसमसच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने आता देशांतर्गत ११०० कोटींची कमाई केली आहे.
हायलाइट्स:
- ‘पुष्पा २’ची जबरदस्त कमाई
- ११०० कोटींचा आकडा पार
- हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ११०९ कोटींचा गल्ला पार
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने २१ व्या दिवशीही रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने तिसऱ्या बुधवारी १९.७५ कोटींची कमाई केली. एकूण या सिनेमाची कमाई भारतात आतापर्यंत ११०९.८५ कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाने आतापर्यंत हिंदीमध्ये एकूण ७१६.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी इतर भाषेतील व्हर्जनपेक्षा सर्वाधिक आहे. मूळ तेलगू भाषेत या चित्रपटाने २१ दिवसांत ३१६.३ कोटी कमावले. ही कमाई हिंदी आवृत्तीच्या जवळपास निम्मी आहे . या चित्रपटाची तुलना गेल्या वर्षी याच काळात प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’शी केली तर ‘पुष्पा २’ या शर्यतीत खूप पुढे आहे. रणबीरच्या ‘ॲनिमल’ने गेल्या वर्षी ख्रिसमसला केवळ ०१.८५ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात मिळून ‘पुष्पा २’ने १५७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. याविषयी योग्य आकडे अद्याप समोर आलेले नाहीत.
सई ताम्हणकरने गाजवलं २०२४! सिनेमा, सीरिज अन् OTTवर मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; बॉलिवूडमध्येही चर्चा
चेंगराचेंगरीत घडलं अघटित
४ डिसेंबर रोजी या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादमध्ये थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झालेला. परिस्थिती एवढी चिघळली होती की, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. आता असे अपडेट समोर आले आहे की, त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले असून त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागेल. या दरम्यान असे वृत्त आहे की, या कुटुंबाला ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांनी आधी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती आणि आता अल्लू अर्जुनने आणखी २ कोटी रुपये दिले आहेत.
अल्लू अर्जुनची साडेतीन तास झाली चौकशी
याच प्रकरणात नुकतीच अभिनेत्याला अटक करण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी पुन्हा गेल्या मंगळवारी त्याची साडेतीन तासांहून अधिक वेळ चौकशी केली. गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी यावे लागेल, असेही पोलिसांनी सांगितले.