Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shani Pradosh 2024 Upay : वर्षाच्या शेवटच्या शनि प्रदोषात करा हे उपाय! नवीन वर्षात राहिल शनिची कृपा, मिळेल लाभ
Shani Pradosh Vrat Upay :
२८ डिसेंबरला वर्षातले शेवटचे शनि प्रदोष व्रत असणार आहे. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे आणि छोटे उपाय केल्यास येणारे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमची प्रगती होऊ शकते. जाणून घेऊया उपायांबद्दल.
२८ डिसेंबरला वर्षातले शेवटचे शनि प्रदोष व्रत असणार आहे. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्याने २०२५ चे नवीन वर्ष तुमच्यासाठी अनुकूल असेल. तसेच शनिदेवाच्या वाईट नजरेपासून तुमचे रक्षण होईल. येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ असेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शनीच्या कृपेने वर्षभरात तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. जाणून घेऊया शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करायला हवेत.
पिंपळ वृक्ष उपाय
शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ अर्पण करुन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडून शनिदेवाचे स्मरण करा. नवीन वर्ष शुभ जाण्यासाठी शनिदेवाजवळ प्रार्थना करा.
शनिवारी करा या वस्तूंचे दान
वर्षाच्या शेवटच्या शनिवारी सकाळी अंघोळ करुन शनिदेवाला काळी उडीद, काळे तीळ, तीळाचे तेल, काळे बूट आणि सूरमा यांसारख्या वस्तू अर्पण करा. यापैकी कोणत्याही एका वस्तूचे दान केल्यास येणारे वर्ष सुखाचे जाईल. तसेच शनीच्या अशुभ स्थितीतही तुम्हाला लाभ होईल.
गाय आणि कुत्र्याची सेवा करा
शनिवारी गाय आणि कुत्र्याची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतील. शनिवारी गूळ आणि चपाती गायीला खाऊ घाला. गाईच्या पायांना स्पर्श करा. त्यांनंतर मोहरीचे तेल लावून चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी. यामुळे देखील शनिदेव प्रसन्न होऊन सर्व संकटे दूर होतात.
या मंत्राचा जप करा
शनिवारी स्नान करून तीळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप ओम प्रं प्रेमं स: शनैश्चराय नमः आणि ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. हा उपाय केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि नवीन वर्षातही शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील.
या गोष्टी लक्षात ठेवा
वर्षाच्या शेवटच्या शनिवारी संकल्प घेऊन अपशब्द वापरणे टाळा. तसेच मोठ्यांचा आदर करा. मुलांशी प्रेमाने वागा. मोठ्यांचा अपमान करणाऱ्यांवर शनिदेव नाराज होतात. तसेच प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.