Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 28 डिसेंबर 2024: स्वतःसाठी थोडा वेळ काढा ! काहीतरी वेगळे काम करण्याचा प्रयत्न करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 28 December 2024 : 28 डिसेंबर, मूलांक 1 साठी धनलाभाचे योग तर मूलांक 2 च्या लोकांना चांगली बातमी मिळणार, मूलांक 4 च्या जातकांनी वेगळे काम करण्याचा प्रयत्न करा, मूलांक 6 असणारे मौज-मस्तीच्या मूडमध्ये असतील. मूलांक 8 चे लोक मनाप्रमाणे काम करतील तर मूलांक 9 असणाऱ्यांनी घेतलेले निर्णय फायदेशीर संधी घेवून येणार आहेत. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – धनलाभाचे योग

मूलांक 1 साठी आजचा दिवस ठिक आहे पण नोकरी आणि व्यवसायात तुम्ही तुमच्या मनाचा अधिक विचार कराल. लवलाइफमध्ये चंचलता अधिक आहे. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणे सोडून द्या. धनसंपत्ती संदर्भात शुभलाभ आहे. आवडीच्या वस्तू खरेदी करणार आहात.
मूलांक 2 – चांगली बातमी मिळणार

मूलांक 2 साठी आजचा दिवस थोडा टेन्शनचा असेल. दुपारी एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होणार. आई-वडिलांचा आशिर्वाद सदैव तुमच्यासोबत असेल त्यामुळे कामे मार्गी लागतील. एखाद्या अशा व्यक्तीच्या संपर्कात येणार आहात ज्यामुळे तुम्ही प्रभावीत व्हाल पण भावनांच्या आहारी वाहत जावू नका.
मूलांक 3 – स्वतःसाठी थोडा वेळ काढा

मूलांक 3 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवा. महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका त्यामुळे अडचणी निर्माण होतील. कोणत्यातरी कारणामुळे मन अशांत राहू शकते, ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. तब्येत सांभाळा, तपासणी करायला सांगितली तर त्वरीत करा.
मूलांक 4 – वेगळे काम करण्याचा प्रयत्न करा

मूलांक 4 साठी दिवस ठिक नाही, तुम्हाला ऑफिसच्या कामात दबाव तंत्राचा त्रास होवू शकतो. दैनंदिन कामांपासून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या संधी मिळतील. तब्येतीमध्ये सुधारणा आहे.
मूलांक 5 – खूप मेहनत करावी लागेल

मूलांक 5 साठी आजचा दिवस खूप मेहनतीचा आहे. कोणत्यातरी व्यक्तीमुळे तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल, त्याचा जास्त त्रास होईल. चिडचिड वाढणार आहे, तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. अपशब्द बोलू नका.
मूलांक 6 – मौज-मस्तीचा मूड आहे

मूलांक 6 असलेल्यांसाठी दिवस उत्तम असून तुम्ही मौज-मस्तीच्या मूडमध्ये असाल. जी कामे पूर्ण व्हायला हवीत त्यात विलंब लागणार आहे. वेळेचा सदुपयोग करा. मित्रांसोबत मस्त गप्पा मारणार आहात, त्यामुळे मन हलकं होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.
मूलांक 7 – तब्येतीची काळजी घ्या

मूलांक 7 असणाऱ्यांसाठी मेहनतीचा आहे. खूप काम केल्यामुळे तुम्हाला थकवा आणि ताण जाणवू शकतो. तब्येतीची काळजी घ्या. कामात एकाग्रतेची गरज आहे तरच कामे पटापट मार्गी लागतील. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणार होणार आहे.
मूलांक 8 – मनाप्रमाणे काम कराल

मूलांक 8 असणाऱ्यांसाठी चांगला आहे तुम्ही मनाप्रमाणे काम करणार आहात. आज मानसिकरित्या गोंधळ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला करायचे एक आणि होणार काहीतरी वेगळे त्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. आज काही क्रिएटीव्ह कामे हाती घ्याल.
मूलांक 9 – निर्णय फायदेशीर संधी घेवून येणार

मूलांक 9 साठी ठिक असून तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर संधी घेवून येणार आहेत. तुमच्या स्वभावात थोडा सौम्यपणा ठेवा, कारण तुम्ही आक्रमकपणे वागलात तर लोकं काही वेगळाच अर्थ काढतील. कार्यक्षेत्रात वातावरण ठिक असेल पण कामाचे नियोजन व्यवस्थित करा.