Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Baby John Box Office Collection: वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या ‘बेबी जॉन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केलेली नाही.
हायलाइट्स:
- ‘बेबी जॉन’ची कमाई घसरली
- ‘मुफासा’ची कमाईही जास्त
- बॉलिवूडला लागलेला ‘ख्रिसमस शाप’ पुन्हा चर्चेत
नाताळ रीलिजचा शाप ‘बेबी जॉन’लाही लागला?
गेल्या सहा वर्षांपासून बॉलिवूडसाठी नाताळचा सण चांगला गेला नाही. कॅलिस दिग्दर्शित ‘बेबी जॉन’मुळे परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही. या शापाची सुरुवात २०१८ साली आलेल्या शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटापासून झाली. हा चित्रपट फ्लॉप ठरला, त्यानंतर ख्रिसमसला रिलीज झालेले ‘दबंग ३’, ‘८३’, ‘सर्कस’ आणि ‘डंकी’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. या यादीत ‘बेबी जॉन’ही बसणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
sacnilk च्या रिपोर्टनुसार, १८५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘बेबी जॉन’ने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी केवळ ३.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनमाने ४.७५ कोटी रुपये कमावले होते, तर पहिल्या दिवशी ११.२५ कोटी रुपयांची कमाई झाली. अशा प्रकारे तीन दिवसांत या चित्रपटाने देशात केवळ १९.६५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दुसरीकडे, वॉल्ट डिस्नेच्या हॉलिवूड ॲनिमेशन ‘मुफासा: द लायन किंग’ने रिलीजच्या ८व्या दिवशी भारतात ६.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने ‘पुष्पा २’ च्या वादळातही मजबूत पकड निर्माण केली आहे. ‘मुसाफा: द लायन किंग’ने आतापर्यंत भारतात ८०.८५ कोटी कमावले आहेत.
Pushpa 2 ने पहिल्यांदाच केली सर्वात कमी कमाई; तरीही बॉक्स ऑफिसवर रचना अनोखा रेकॉर्ड
ख्रिसमसनंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येचा प्रभाव आता चित्रपटगृहांमध्ये दिसून येत आहे. दिल्ली-एनसीआरमधील बदलत्या हवामानाचा परिणाम चित्रपटांच्या कमाईवरही झाला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ने शुक्रवारी पहिल्यांदाच १० कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली आहे. रिलीजच्या २३व्या दिवशी, ‘पुष्पा २: द रुल’ ने देशात ८.७५ कोटी रुपये नेट कलेक्शन केले आहे. या सिनमाचे एकूण कलेक्शन ११२८.८५ कोटी रुपये झाले आहे.
‘बेबी जॉन’ची ही अवस्था या सिनेमाचा निर्माता अॅटलीसाठी मोठा धक्का आहे. निर्माता म्हणून हा त्याचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असून त्याची गणना सर्वात यशस्वी आणि फायदेशीर चित्रपट निर्मात्यांमध्ये केली जाते. पण ‘ख्रिसमसच्या शापा’ने त्यालाही सोडले नाही. सध्याची स्थिती पाहता, ‘बेबी जॉन’ ८०-८५ कोटी कमावेल असेही वाटत नाही.