Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

२०२५मध्ये हे मराठी सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नागराज मंजुळेंच्या ‘त्या’ सिनेमाची उत्सुकता

5

Upcoming marathi movie 2025: मराठी चित्रपटविश्वासाठी मागचं वर्ष संमिश्र गेलं. वैविध्यपूर्ण विषय, तंत्रज्ञानाचा वापर, कलाकार, सादरीकरण अशा सर्वच बाबींमुळे सिनेमे लक्षवेधी ठरले. आता नव्या वर्षात सिनेमांचं नवं पर्व दिसणार आहे. प्रतिष्ठित दिग्दर्शकांचे सिनेमे, महत्त्वाकांक्षी कलाकृती यामुळे हे वर्षही मराठी सिनेसृष्टीसाठी खास ठरेल अशी आशा व्यक्त केली जातेय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होताना दिसताहेत. अनेक प्रतिष्ठित दिग्दर्शक आगामी काळात महत्त्वपूर्ण सिनेमे घेऊन येत आहेत. त्यामुळे नवीन वर्षांत मराठी सिनेमा वेगळ्या उंचीवर जाईल अशी सिनेकत्यांना आशा आहे. नवीन वर्षाची सुरुवात मराठी सिनेविश्वासाठी खास ठरणार आहे. पहिल्याच काही आठवड्यांमध्ये ‘मल्टिस्टारर सिनेमांची रेलचेल’ पाहायला मिळणार आहे.

‘मु. पो. बोंबिलवाडी’, ‘संगीत मानापमान’, ‘जिलबी’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘गोल गोल राणी’, ‘प्रेमाची गोष्ट २’ या सिनेमांत मराठीतले आघाडीचे कलाकार एकत्र झळकणार आहेत. प्रस्थापित कलाकारांना एकत्र सिनेमात आणण्यासाठी निमति आग्रही आहेत. त्यात सिक्वेल सिनेमेही आहेत. यामध्ये अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा साडे माडे तीन’, संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ आणि ‘पुन्हा दुनियादारी’ या सिनेमांचा समावेश आहे. दिग्दर्शक मंडळीही मराठी सिनेमांचे विषय, मांडणी, सादरीकरण यावर विचार करत नवं काही देण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच आगामी काळात अनेक महत्त्वाकांक्षी कलाकृती प्रदर्शित होणार आहेत.

मुलाच्या पहिल्या बर्थडेनंतर दोनच महिन्यात अभिनेत्रीनं पुन्हा शेअर केली गुडन्यूज, तो व्हिडिओ व्हायरल
इतिहास आणि साहित्याची पानं ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमानंतर सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ च्या निमित्तानं पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेता रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात तो स्वतः महाराजांची भूमिका साकारत आहे. तसंच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सिनेमाही पोस्ट प्रोडक्शनच्या शेवटच्या टप्प्यात आहे. यात अभिनेता अक्षयकुमार यानं छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून वेगळेपण दाखवून देणारा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीवर सिनेमा करतोय. तर ‘शिवअष्टक’ सिनेमांसह दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच ‘मुक्ताई’ हा चित्रपट नववर्षांत प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे याचं दिग्दर्शन असलेल्या ‘खाशाबा’ या सिनेमाकडेसुद्धा प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.

२०२५मध्ये हे मराठी सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नागराज मंजुळेंच्या ‘त्या’ सिनेमाची उत्सुकता

याकडेही लक्ष
! ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन ‘रावसाहेब’ या सिनेमावर काम करतोय. या सिनेमात मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच प्रसाद ओकचा ‘वडापाव’, केदार शिंदेचा ‘झापुक झुपूक’, तेजस देऊस्करचा ‘देवमाणूस’ अशा वैविवध्यपूर्ण विषय असलेल्या सिनेमांमुळे प्रेक्षकांनाही नवा अनुभव मिळेल अशी खात्री व्यक्त केली जातेय.

कल्पेशराज कुबल

लेखकाबद्दलकल्पेशराज कुबलकल्पेशराज कुबल हे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये सिनिअर डिजिटल कंटेंन्ट क्रिएटर (सिनिअर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट) म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ११ वर्षांपासून ते पत्रकारिता, कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या आजअखेरच्या प्रवासात सांस्कृतिक सण-उत्सव, शिक्षण, फॅशन आदी विविध क्षेत्रे, विषयांची हाताळणी त्यांनी केली. विशेषत: गेल्या सहा वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राचे वृत्तांकन (मराठी सिनेसृष्टी, बॉलिवूड आणि नाट्यसृष्टी विषयी लिखाण.) ते करत आहेत. दैनिकाच्या ‘थ्रीडी’ या चित्रपट समिक्षणाच्या सदरासाठी ते गेल्या पाच वर्षांपासून लिखाण करत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘माझी पहिली भूमिका’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. कलाकारांच्या व्यावसायिक प्रवासाविषयी, विविधांगी भूमिकांविषयी या सदरात लिखाण त्यांनी केले आहे. ‘सिनेमा’ या विषयावर नियतकालिके, डिजिटल माध्यमात त्यांनी लिखाण केले आहे. कल्पेशराज हे तरुण पत्रकार असण्यासोबत ते ‘फोटोग्राफर’ आणि ‘आर्टिस्ट’ देखील आहे. तसेच त्याच्या नावावर भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे ‘लार्जेस्ट पेपर पोर्ट्रेट’ बनवण्याचा ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ आहे.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.