Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Laddu Gopal Puja Niyam : घरी बाळ गोपाळांची मूर्ती आहे? पुजा करताना हे नियम लक्षात ठेवाच!

6

Bal Gopal Puja Rituals : हिंदू धर्मात देवी- देवतांना अधिक महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळ गोपाळ असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकांच्या मनात नेहमी प्रश्न पडतो. बाळ गोपाळाची पूजा कशा पद्धतीने करायला हवी. जो व्यक्ती खऱ्या मनाने आणि भक्तीभावाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊया हिवाळ्यात बाळ गोपाळांची काळजी कशी घ्यावी.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Winters Laddu Gopal Chi Seva
हिंदू धर्मात देवी- देवतांना अधिक महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळ गोपाळ असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकांच्या मनात नेहमी प्रश्न पडतो. बाळ गोपाळाची पूजा कशा पद्धतीने करायला हवी.
धार्मिक नियमानुसार बाळ गोपाळाची ऋतुनुसार त्यांची काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत तुम्ही गोपाळांची विशेष काळजी घ्यावी. असे म्हटले जाते की, बाळ गोपाळाची काळजी घेताना काही विशेष नियम लक्षात ठेवायला हवे. जो व्यक्ती खऱ्या मनाने आणि भक्तीभावाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊया हिवाळ्यात बाळ गोपाळांची काळजी कशी घ्यावी.

अशा प्रकारे बाळ गोपाळांना आंघोळ घाला.

बाळ गोपाळांच्या सेवेत त्यांना रोज आंघोळ घातली जाते. परंतु, उत्तर भारतात हिवाळ्यात बाळ गोपाळाना सकाळी उशिरा उठवून आंघोळ घालतात. त्यासाठी पाणी देखील थोडे कोमट असावे. त्या पाण्यात तुळशीचे पान टाका. स्नान करण्यापूर्वी दिवा लावा.

आंघोळीनंतर हे करा

प्रभूला आंघोळ घातल्यानंतर लगेच उबदार कपडे घाला. तसेच त्यांच्या आसनावर कापड पसरावा. तर त्यांना उबदार टोपी घालून ठेवा.

हिवाळ्यात या गोष्टी लड्डू गोपाळांना अर्पण करा

हिवाळ्यात लड्डू गोपाळांना विशेष प्रकारचा नैवेद्य दाखवावा. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तिळाचे लाडू आणि डिंकाचे लाडूही तयार करू शकता. तसेच त्यांना सकाळ संध्याकाळ हळदीचे दूध अर्पण करावे.

लड्डू गोपळांना झोपवण्याचा नियम

रात्री लड्डू गोपाळला झोपवताना, त्याला उबदार चादर आणि रजाईने झाका. रात्रीच्या वेळी जरा लवकर झोपवा. तसेच त्यांच्या पलंगावर उबदार चादर पसरवावी.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.