Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यपालांच्या उपस्थितीत एचएसएनसी विद्यापीठाचा तिसरा दीक्षान्त सोहळा संपन्न – महासंवाद

5

मुंबई, दि. ०९ : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण सुरूच ठेवले पाहिजे. स्वयंशिस्त, ध्येयासाठी परिश्रम व सातत्य ठेवल्यास यश हे निश्चितपणे मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले.

एचएसएनसी, मुंबई विद्यापीठाचा तिसरा दीक्षान्त सोहळा राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या वरळी येथील दीक्षान्त सभागृहात सपंन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध विद्याशाखांमधील ३८ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. जयेश जोगळेकर, अधिष्ठाता, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, पालक तसेच स्नातक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. निरंजन हिरानंदानी यांना विद्यापीठाचे पहिले प्रोव्होस्ट म्हणून यशस्वी कार्य केल्याबद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Maharashtra Governor presides over 3rd Convocation of HSNC University; gives away Gold Medals to 38 toppers

Maharashtra Governor and Chancellor of universities C P Radhakrishnan presided over the 3rd Annual Convocation of the HSNC University at Worli, Mumbai on Thu (9 Jan). Gold Medals were presented to 38 toppers from various disciplines.

Provost of HSNC University Dr. Niranjan Hiranandani, Vice Chancellor Prof. Hemlata Bagla, Trustee & President of HSNC Board Anil Harish, Registrar Bhagwan Balani, Director of Examination and Evaluation Dr. Jayesh Joglekar, Principals of Colleges, teachers and graduating students were present. The Governor also presented a Citation to Dr Niranjan Hiranandani for serving as the first provost of the HSNC University.

0000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.