Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, ११ जानेवारी २०२५ : शनिप्रदोष! वृश्चिकसह ४ राशींचा त्रास वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्या, वाचा शनिवारचे राशीभविष्य
Today Horoscope 11 january in Marathi, आजचे राशीभविष्य: आज शनिवार ११ जानेवारी रोजी चंद्र मिथुन राशीत जाणार आहे. पौष शुक्ल पक्षातील द्वादशीला प्रदोष व्रताचा शुभ संयोग होत आहे. तसेच शनिप्रदोष व्रत असणार आहे. मृग नक्षत्र असेल. तसेच आज ५ राशींना लाभ होणार आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून कर्ज घेण्याचा विचार असेल तर सहज मिळले. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा आहे.
आज शनिवार ११ जानेवारी रोजी चंद्र मिथुन राशीत जाणार आहे. पौष शुक्ल पक्षातील द्वादशीला प्रदोष व्रताचा शुभ संयोग होत आहे. तसेच शनिप्रदोष व्रत असणार आहे. मृग नक्षत्र असेल. तसेच आज ५ राशींना लाभ होणार आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून कर्ज घेण्याचा विचार असेल तर सहज मिळले. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कार्यक्षेत्रात काही नवीन कराल. तुमच्या आरोग्यावर परिणाम होतील. जोडीदाराच्या कठोर शब्दांमुळे नात्यात दुरावा येईल. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात लाभ
आज तुमच्या बिघडलेल्या तब्येतीत सुधारणा होईल. व्यवसायात काही नवीन लोक भेटतील. व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. ओळखीच्या व्यक्तीकडून कर्ज घेण्याचा विचार असेल तर सहज मिळले. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कार्यक्षेत्रात काही नवीन कराल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचे पठण करा.
वृषभ – नात्यात दूरावा
आज नवीन लोकांशी संपर्क साधाल. ज्यामुळे रोजगार मिळण्यास मदत होईल. कुटुंबात काही तणाव निर्माण होईल. तुम्हाला तो टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या आरोग्यावर परिणाम होतील. जोडीदाराच्या कठोर शब्दांमुळे नात्यात दुरावा येईल. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
मिथुन – पैसे खर्च कराल
आज तुमची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होईल. सामाजिक वर्तुळ वाढेल. तुम्ही नवीन मित्र बनवाल. सामाजिक कार्यक्रमांवर पैसे खर्च कराल. इतर कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका. विद्यार्थ्यांना ज्ञान आणि अनुभव मिळेल. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होतील.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा.
कर्क – रखडलेले काम पूर्ण होईल
आज रखडलेले काम पूर्ण करण्यास भावाची मदत मिळेल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही प्रवास कराल. ज्यातून तुम्हाला फायदा होईल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोणी अर्पण करा.
सिंह – आर्थिक संकटे येतील
आज तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्यातून फायदा होईल. तुम्हाला पैसे खर्च करणे टाळावे लागेल, अन्यथा आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. घरी पाहुणे आल्याने वेळ वाया जाईल. व्यवसायात भरपूर नफा मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहिल. मुलांकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा.
कन्या – वादात पडणे टाळा
आज तुम्हाला व्यवसायात नवीन योजना राबवाव्या लागतील. मुलांसाठी वेळ काढू शकणार नाही, त्यामुळे नाराज राहातील. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांच्या नात्यात नवीन ऊर्जा संचारेल. नोकरदार लोकांनी कोणत्याही वादात पडणे टाळावे. अडचणी निर्माण होऊ शकतील.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा
तुळ – कामात विलंब
आज कोणत्याही नवीन योजनेत गुंतवणूक करत असाल तर वडिलांचा सल्ला घ्या. अन्यथा कामात विलंब होईल. कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीच्या शोधात असाल तर थोडे थांबा. भावंडांसोबत काही वाद होतील.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.
वृश्चिक- त्रास होईल
आज तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे त्रास होऊ शकतो. तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. ऐषोआरामावर काही पैसे खर्च करावे लागतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. आर्थिक स्थिती हळुहळु सुधारेल. कामाच्या ठिकाणी अनेक आव्हाने येतील.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे १०८ वेळा नामस्मरण करा.
धनु – अडचणी वाढतील
आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. ज्यामुळे अडचणी वाढू शकतात. तुम्ही जे काही काम कराल ते चांगल्या मनाने करा. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक कराल. भविष्यात तुम्हाला त्याचा पुरेपुर फायदा होईल. भावंडांमध्ये काही वाद असतील तर ते कुटुंबाच्या मदतीने सोडवण्यात यशस्वी व्हाल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजूंना जेवू घाला.
मकर – नाते घट्ट होईल
आज दीर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्या संपतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. राजकारणाशी निगडित लोकांना आज जाहीर सभा घेण्याची संधी मिळेल. एखाद्या मित्राला भेटू शकता. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. तुमचे नाते घट्ट होईल. कामाच्या ठिकाणी हुशारीने वागाल.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्रदान करा.
कुंभ – खर्चावर नियंत्रण ठेवा
आज तुम्हाला कार्यक्षेत्रात अधिक मेहनत करावी लागेल. तरच चांगला नफा मिळेल. व्यस्त जीवनशैलीतून प्रेम जीवनासाठी वेळ काढू शकाल. घरातील काही वस्तूंवर पैसे खर्च कराल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक स्थिती अडचणीत येईल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा.
मीन – आरोग्याकडे लक्ष द्या
आज तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. निष्काळजीपणा करु नका. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यावसायिकांना पैशांचा तुटवडा जाणवेल. कुटुंबातील काही गोष्टींवर विचार कराल. पालकांशी बोलण्यात वेळ घालवाल.
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.