Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 14 जानेवारी 2025 : मकर संक्रातीला वृषभला मिळणार आनंदाची बातमी ! तुळ राशीसाठी नवीन कामे सुरु होणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 14 January 2025 In Marathi : १४ जानेवारी मकर संक्रात असून सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तर शनि देव त्यांच्या मुळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहेत. तसेच धनयोग, शश राजयोग देखील तयार होत आहेत. यामुळे मकर संक्रांतीला तुळ, मकरसह या राशींवर सूर्य-शनिची कृपा राहिल. मेषसाठी थांबलेली कामे मार्गी लागतील, वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, कर्क राशीने घाईघाईत निर्णय घेऊ नये तर मीन राशीची व्यवसायात प्रगती असेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : थांबलेली कामे मार्गी लागतील
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून जे लोक राजकारणात आहेत, त्यांना यश मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहणार आहात. थांबलेली कामे पूर्ण होतील. पचनसंस्था आणि डोळे यांचे आजार डोके वर काढतील काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : चांगली बातमी मिळणार
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून कुटुंबासोबत आनंदात दिवस व्यतीत होणार आहे. एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे मन भरून येईल. तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळी पाहुणे येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात, त्यामुळे मान सन्मान वाढेल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर भरपूर काम राहणार आहे. तुमच्याकडून जास्त खर्च होतोय तो आधी कमी करा. संध्याकाळी वाहन चालवताना सावध राहा. एखाद्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीची भेट झाल्यामुळे मनोबल वाढेल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : घाईघाईत निर्णय घेऊ नका
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवसायात प्रगती होईल तसेच नवीन प्रोजेक्ट आल्यामुळे कामे वाढत आहेत. तुम्ही नियोजन आणि व्यवस्थापन याकडे लक्ष द्या. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. संध्याकाळी धार्मिक स्थळाला भेट देणार आहात.
सिंह आर्थिक राशिभविष्य : ऑफिसच्या कामात बदल
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून तुम्ही इतरांची मदत करणार आहात. दुसऱ्यांची मदत केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे सहकारी नाराज होतील. तुम्ही सगळ्यांकडे दुर्लक्ष करा आणि कामात फोकस करा. कुटुंबातील कोणाची तरी तब्येत खराब होईल, तेव्हा सतर्क राहा.
कन्या आर्थिक राशिभविष्य : खर्च जास्त होणार
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून ज्येष्ठांची सेवा आणि धार्मिक कार्यांमध्ये पैसा खर्च करणार आहात. विरोधकांवर तुम्ही मात करणार आहात. कुटुंबीयांसोबत आजचा दिवस आनंदात व्यतीत होणार आहे. कामात फोकस महत्त्वाचा आहे.
तुळ आर्थिक राशिभविष्य : नवीन कामे सुरु होतील
तुळ राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून शैक्षणिक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नवीन काम सुरू होऊ शकते. तुमच्या प्रभावी बोलण्याने मान-सन्मान वाढेल. धावपळीमुळे आरोग्य खराब होऊ शकते, त्याची काळजी घ्या. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रवासाचा योग असून त्यात आनंद मिळेल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थिती मजबूत
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही समाधानी असाल. थांबलेली कामे पूर्ण होतील. मित्रांची भेट होईल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आज बोलताना थोडे सावध राहा तसेच वाणीवर नियंत्रण ठेवा.
धनू आर्थिक राशिभविष्य : आर्थिक व्यवहार करताना सर्तक राहा
धनु राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून घरातील वस्तूंवर खर्च करावा लागेल. तुमच्या सुख-साधनांमध्ये वाढ होणार आहे. काही नातेवाईक किंवा कर्मचाऱ्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक व्यवहार करताना सर्तक राहा. दिवसभर सरकारी कामांमध्ये अडचणी येऊ शकतात, पण तुमचे काम मार्गी लागेल. विरोधक आज काहीही करू शकणार नाहीत.
मकर आर्थिक राशिभविष्य : नवीन व्यवसाय सुरु करण्याची शक्यता
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून जे व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला नफा होईल. आर्थिक स्थिती सुधारणा होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. परीक्षेत यश मिळेल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. संध्याकाळी धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम रद्द होईल. गाडी चालवताना सावध राहा, कारण गाडीतील बिघाड खर्च वाढविणार आहे.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : तब्येतीवर जास्त खर्च होणार
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ओके आहे कारण अचानक तब्येत बिघडल्यामुळे तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला यात खर्च वाढणार आहे. जमिनीसंबंधी खरेदी-विक्री करताना सर्व कायदेशीर बाबी काळजीपूर्वक समजून घ्या. संध्याकाळी तब्येतीत सुधारणा होईल, पथ्यपाणी सांभाळा कारण पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो.
मीन आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात प्रगती
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून वैवाहिक जीवनात आनंद असेल. जवळचा किंवा लांबचा प्रवास होवू शकतो त्यामुळे लाभ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल, तसेच मिळकतीचे नवे मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचा ताण कमी होईल. मानसिक समाधान मिळणार असून घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला लाभदायक असेल.