Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes : स्वराज्याचे धाकलं मालक, शिवबाचा छावा! छत्रपती संभाजीराजे राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त मावळ्यांना पाठवा शुभेच्छा!
Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Message : पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी ‘बुधभूषण’, ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ग्रंथ लिहिले होते. ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ होता, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ होते. त्यांच्या कारकिर्दित त्यांनी प्रचंड पराक्रम केला. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यादिनामित्त पाठवूया मावळ्यांना शुभेच्छा.
Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Quotes In Marathi :
पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांची ओळख आहे.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी छत्रपती संभाजी महाराज गादीवर विराजमान झाले. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ साली झाला.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने रायगड किल्ला काबीज करण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु, त्याला त्यात यश मिळाले नाही. पंरतु औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीला अटक होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली आणि महाराज पकडले गेले. त्यांनी अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला शेवटी ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी वीरमरण आले.
छत्रपती संभाजी महाराजांनी ‘बुधभूषण’, ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ग्रंथ लिहिले होते. ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ होता, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ होते. त्यांच्या कारकिर्दित त्यांनी प्रचंड पराक्रम केला. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यादिनामित्त पाठवूया मावळ्यांना शुभेच्छा.
कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला…
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला…
राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन !
सह्याद्रीच्या रुद्राचा राज्याभिषेक…..
नरसिंहाच्या छाव्याचा राज्याभिषेक…
जिजाऊंच्या नातवाचा राज्याभिषेक…..
धगधगत्या पर्वाचा राज्याभिषेक….
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक!
सजलं सोनेरी सिंहासन,
लाभलं छत्र माय मातीला…
छत्रपती जाहला राजा, अभिमान मर्द मराठ्या छातीला!
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
हिमालयाएवढे शौर्य असलेले धर्मवीर,
महापराक्रमी, शिवबाचा छावा,
छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्यभिषेक दिनानिमित्त
मानाचा मुजरा!
“प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज”
“महाराज” “श्रीमंत”श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
धनी तुमच्यापुढे नतमस्तक
अवघी रणवीरांच्या तलवारीची पाती
मावळा म्हणजे तुमच्या चरणाची माती
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
प्राणपणाने लढून अखंड स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्यरक्षक,
क्षात्रतेज्ञ, क्षात्रवीर, धर्मरक्षक
छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!