Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. २०, मंगळवार दि.२१, बुधवार दि. २२ आणि गुरूवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि.२१ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
राज्य शासन समाजातील सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. प्रामुख्याने महिला, बालके, युवक, तसेच मागासवर्गीय व वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात आहे. याअनुषंगाने आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शबरी कॉर्पोरेशन अंतर्गत ‘वन धन’ केंद्रांद्वारे उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शबरी नॅचरल्स’नावाचा ब्रँड तयार करण्यात आला आहे. यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. याचबरोबर ‘वन धन’ केंद्रांद्वारे उत्पादित उत्पादनांसाठी ई-कॉमर्स वेब पोर्टल सुरू करणे, आदिवासी जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढवणे या योजनांची अंमलबजावणी, ‘शबरी नॅचरल्स’ब्रँडच्या माध्यमातून उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने विभागाचा आराखडा, याविषयी व्यवस्थापकीय संचालक श्रीमती बनसोड यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.
०००