Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Weekly Horoscope 20 to 26 January 2025 : धनुसह ५ राशींचे आर्थिक बजेट बिघडेल! वाहन जपून चालवा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 20 to 26 January 2025 : या आठवड्यात मंगळ मिथुन राशीत कर्क राशीतून त्याच्या वक्री अवस्थेत येणार आहे. चंद्र वृश्चिक राशीत असेल. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होईल. परंतु गुरूच्या शुभ राशीमुळे चंद्र दुर्बल होऊन गजकेसरी योगही तयार होईल. या आठवड्यात ५ राशींना आर्थिक चणचण भासेल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
या आठवड्यात मंगळ मिथुन राशीत कर्क राशीतून त्याच्या वक्री अवस्थेत येणार आहे. चंद्र वृश्चिक राशीत असेल. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होईल. परंतु गुरूच्या शुभ राशीमुळे चंद्र दुर्बल होऊन गजकेसरी योगही तयार होईल. या आठवड्यात ५ राशींना आर्थिक चणचण भासेल. कामानिमित्त लांबचा प्रवास कराल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ राहिल. आरोग्य थोडे कमकुवत असेल. आहाराची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधात परिस्थिती सामान्य असेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कौटुंबिक जीवनात सहकार्य मिळेल. तुमची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा करावी लागेल. पार्टनरशीपरमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा मिळेल. या आठवड्यात प्रेमसंबंधात विचारपूर्वक पुढे जा. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
मेष – पदोन्नती होईल
![](https://static.langimg.com/thumb/117388138/maharashtra-times-117388138.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आणि भाग्याचा असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अचानक मोठा फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना हा आठवडा अतिशय शुभ असेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. इच्छित लोकांची पदोन्नती होईल. मोठी जबाबदारी मिळेल. कामानिमित्त लांबचा प्रवास कराल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ राहिल. आरोग्य थोडे कमकुवत असेल. आहाराची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधात परिस्थिती सामान्य असेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कौटुंबिक जीवनात सहकार्य मिळेल.
भाग्यशाली अंक : 10
भाग्यशाली रंग : काळा
वृषभ – विश्वासघात होईल
![](https://static.langimg.com/thumb/117388124/maharashtra-times-117388124.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. विश्वासघात होऊ शकतो. तुमच्या मनात निराशेची भावना येईल. नोकरदार लोकांना कामाचा ताण जास्त असेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना काही चढ-उतारांचा सामना करावा लागेल. तुमची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा करावी लागेल. पार्टनरशीपरमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा मिळेल. या आठवड्यात प्रेमसंबंधात विचारपूर्वक पुढे जा. घाईने निर्णय घेतल्यास समस्या येतील. जोडीदाराची साथ मिळेल.
भाग्यशाली अंक : 1
भाग्यशाली रंग : पांढरा
मिथुन – खर्चावर नियंत्रण ठेवा.
![](https://static.langimg.com/thumb/117388116/maharashtra-times-117388116.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला बुद्धिमत्ता, वाणी आणि विवेकाचा चांगला वापर करावा लागणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद घालू नका. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. काम वेळवर पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कामाचा बोजा अचानक वाढल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. रोजगाराच्या संधीसाठी वाट पाहावी लागेल. प्रेमसंबंधाच्याबाबतीत हा आठवडा संमिश्र राहिल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. समस्या तुमच्या चिंतेचे कारण बनेल. आर्थिकदृष्टीकोनातून उत्पन्नात वाढ होणार नाही. दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवा.
भाग्यशाली अंक : 7
भाग्यशाली रंग : सोनेरी
कर्क – चिंता दूर होईल
![](https://static.langimg.com/thumb/117388093/maharashtra-times-117388093.jpg?width=700&height=394&resizemode=75)
कर्क राशीसाठी हा आठवडा अधिक शुभ परिणाम देईल. तुमची मोठी चिंता दूर होणार आहे. कोणत्याही मोठ्या समस्येपासून मुक्त झाल्याने सुटकेचा श्वास सोडाल. नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी कामाला लागाल. व्यवसायातील लोकांना चांगली बातमी मिळेल. मालमत्तेसंबंधित काळ शुभ राहिल. आर्थिब बाबतीत नियोजन चांगले केल्यास नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ सामान्य राहिल. खाण्याच्या सवयींवर लक्ष द्या. अचानक शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध सामान्य असतील.
भाग्यशाली अंक : 15
भाग्यशाली रंग : तपकिरी
सिंह – रखडलेली कामे पूर्ण होतील
![](https://static.langimg.com/thumb/117388053/maharashtra-times-117388053.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असेल. करिअर- व्यवसायात मोठ्या संधी मिळतील. तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. आरोग्य आणि मालमत्तेशी संबंधित समस्या दूर होतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप मिळेल. नोकरीत मान-सन्मान वाढेल. कामात अपेक्षित यश मिळाल्याने सहकाऱ्यांशी नाते घट्ट होईल. मुलाच्या काही मोठ्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. मालमत्तेसंबंधित मोठा निर्णय घ्या. आर्थिकदृष्टीकोनातून या आठवड्यात चांगला नफा मिळेल. नियमित उत्पन्नामुळे आर्थिक स्थिती मजबूत असेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत असतील.
भाग्यशाली अंक : 9
भाग्यशाली रंग : राखाडी
कन्या – संधी मिळेल
![](https://static.langimg.com/thumb/117388037/maharashtra-times-117388037.jpg?width=700&height=394&resizemode=75)
कन्या राशीसाठी हा आठवडा शुभ असेल. या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे नशिब चमकू शकते. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागेल. व्यावसायिक संबंध सुधारतील. मोठया योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन होईल. आई-वडिलांचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये अनुकूलता राहील.
भाग्यशाली अंक : 11
भाग्यशाली रंग : जांभळा
तुळ – ताण वाढेल
![](https://static.langimg.com/thumb/117388028/maharashtra-times-117388028.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेण्याचा असेल. विचार न करता निर्णय घेऊ नका. हिंतचिंतकांचा सल्ला घ्या. नोकरदार लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या जास्त ताणामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जास्त थकलेले असाल. बदली झाल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. व्यावसायिकांना या आठवड्यात मंदीचा सामना करावा लागेल. नुकसान भरुन काढण्यासाठी मदत होईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित होईल. प्रेमसंबंधात काही मुद्द्यांवर जोडीदाराशी वाद होईल. जोडीदाराच्या तब्येतीबद्दल चिंतेत अशाल.
भाग्यशाली अंक : 8
भाग्यशाली रंग : आसमानी
वृश्चिक – आव्हाने येतील
![](https://static.langimg.com/thumb/117388015/maharashtra-times-117388015.jpg?width=700&height=394&resizemode=75)
या आठवड्यात तुम्हाला अधिक आव्हांनाना सामोरे जावे लागेल. व्यवसायाशी संबंधित समस्या चिंतेचे कारण बनतील. कामात उशीर झाल्याने राग आणि उत्साह वाढेल. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जुने आजार वाढतील. मन चिंताग्रस्त राहिल. व्यवसायात मंदीचा सामना करावा लागेल. बाजारात पैसे अडकल्याने मन चिंताग्रस्त राहिल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत एकत्र काम करावे लागेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहिल. जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल.
भाग्यशाली अंक : 2
भाग्यशाली रंग : निळा
धनु – आर्थिक चणचण भासेल
![](https://static.langimg.com/thumb/117387995/maharashtra-times-117387995.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी सुख आणि सौभाग्य देणारा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळतील. पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. हितचिंतकांच्या मदतीने समाधानात सापडाल. व्यवसाय वाढवण्याच्या योजनेत यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत चणचण भासेल. मोठ्या प्रमाणात पैसे खर्च कराल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील.
भाग्यशाली अंक : 5
भाग्यशाली रंग : लाल
मकर – मतभेद होतील
![](https://static.langimg.com/thumb/117387979/maharashtra-times-117387979.jpg?width=700&height=394&resizemode=75)
या आठवड्यात हुशारीने काम करावे लागेल. अन्यथा परिणाम वाईट होतील. कामाच्या ठिकाणी लोकांपासून अंतर ठेवा, दिशाभूल होऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. तुमचे काम खराब होऊ शकते. कोर्टात काही प्रकरणे सुरु असतील तर ते बिघडली जातील. जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोकांना काम आणि घरात संतुलन राखावे लागेल. मोठ्या खर्चांमुळे बजेट बिघडेल. प्रेमसंबंधात जोडीदाराशी मतभेद होतील.
भाग्यशाली अंक : 6
भाग्यशाली रंग : हिरवा
कुंभ – पैशाचा लाभ मिळेल
![](https://static.langimg.com/thumb/117387967/maharashtra-times-117387967.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आणि भाग्याचा असणार आहे. एखादे काम पूर्ण करण्यासाठी विशेष संधी मिळेल. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. बुद्धिमत्तेच्या सहाय्याने मोठी कामे सहज कराल. तुमची नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार नाही. मित्र आणि कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य सामान्य राहिल. नोकरदार लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या मोठे लाभ मिळतील. योजनेत गुंतवलेल्या पैशाचा लाभ मिळेल. व्यवसायत चांगला सुरु राहिल. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल
भाग्यशाली अंक : 8
भाग्यशाली रंग : गुलाबी
मीन – वाहन जपून चालवा
![](https://static.langimg.com/thumb/117387962/maharashtra-times-117387962.jpg?width=700&height=394&resizemode=75)
हा आठवडा करिअर आणि व्यवसायात बदल करण्याचा असेल. कोणाताही निर्णय विचारपूर्व घ्या. रागाच्या भरात किंवा घाईत कोणाताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. नोकरदार लोकांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. मालमत्तेशी संबंधिक वाद सोडवण्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी वाढेल. अचानक लांबचा प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवा. दुखापत होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनासाठी जोडीदाराशी समन्वय ठेवा. प्रेमात सावधगिरीने पुढे जा
भाग्यशाली अंक : 5
भाग्यशाली रंग : पिवळा