Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maha Kumbh 2025: महाकुंभ दरम्यान ग्रहांचा विशेष योग ! राशींवर कसा असेल प्रभाव? जीवनात कसा होईल बदल? जाणून घ्या
Mahakumbh aani Grahancha Sambandh: तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण ती वेळ मानसिक शांती-समाधान आणि स्वतःला समजून घेण्यासाठी उत्तम असते. तसेच एखादा बदल, नवीन संधी किंवा समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
ग्रह आणि कुंभमेळा यांचा संबंध

कुंभमेळा १२ वर्षातून एकदा आयोजीत केला जातो. कुंभमेळा म्हणजे गुरु आणि सूर्याच्या उर्जेचा उत्सव आहे. जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये भ्रमण करतात आणि ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीमध्ये उच्च स्थितीत असतो, तेव्हा कुंभच्या ऊर्जा स्रोताचे विसर्जन हरिद्वारमधील गंगा येथे होते. तर जेव्हा सूर्य आणि गुरु कुंभ राशीवरून सप्तम सिंह राशीत संक्रमण करतात, तेव्हा त्याचे विकिरण कुंभ राशीवर सर्वाधिक असते. दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदीवर त्याचा सर्वाधिक प्रभाव असतो. ज्योतषशास्त्राच्या मान्यतेनुसार ग्रहांची विशिष्ट कोनीय स्थिती नदीच्या पाण्यात एक औषधी प्रभाव निर्माण करते, ज्यामुळे विशेष ग्रहस्थितीमध्ये स्नान केल्यास अमृत फल प्राप्त होते. सूर्य मेष राशीमध्ये आणि गुरु सिंह राशीमध्ये असताना, मेष राशीला सर्वाधिक ऊर्जा प्राप्त होते आणि म्हणूनच उज्जैनच्या शिप्रा नदीवर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
अमृत महाकुंभ कधी आहे?

वृषभ राशीतील गुरु आणि सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करताना कुंभ लागतो, जिथे मकर राशीवरील सूर्य गुरु दृष्टि क्षेत्रात आल्यामुळे कुंभमेळा प्रयागराजमध्ये साजरा केला जातो. यावर्षी 144 वर्षांनी महाकुंभ 21 तारखेला सुरू होणार आहे, जेव्हा 7 ग्रह एका रांगेत येतील. यामुळे हा महाकुंभ ‘अमृत महाकुंभ’ म्हणून ओळखला जाणार आहे. बुध, शनि, शुक्र, गुरु, मंगल, नेपच्यून आणि युरेनस हे ग्रह जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा त्याचा प्रभाव देश आणि प्रत्येक राशीवर पडतो. अशी दुर्मिळ घटना 1962 मध्ये घडली होती आणि भविष्यात 2050 मध्ये घडेल. 28 फेब्रुवारीपर्यंत हे सर्व ग्रह एकाच रेषेत येतील, आणि हा एक अद्भुत संयोग असून त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण ती वेळ मानसिक शांती-समाधान आणि स्वतःला समजून घेण्यासाठी उत्तम असते. तसेच एखादा बदल, नवीन संधी किंवा समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा असतो. तुम्ही आकाशात पाहिल तर हे ७ ग्रह दक्षिण-पश्चिमेपासून पूर्वेकडे पाहता येतील, म्हणजेच मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि मिथुन या राशींच्या क्षेत्रात ते येतात. यावेळी या ग्रहांच्या ऊर्जेचा सर्वाधिक प्रभाव कर्क, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशींवर पडेल.
मौनी अमावस्येला स्नान-दानाचे महत्त्व

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध २१ जानेवारीपासून मिथुन राशीत मंगलाच्या प्रवेशामुळे ४ एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारताचा जवळपास असणाऱ्या राष्ट्रांसोबत तणाव वाढू शकतो, पण एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था उत्तम असेल.
असे म्हणतात, कुंभमेळ्यात जे स्नानाचा लाभ घेतील त्यांना ग्रहांची ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे रोगमुक्ती आणि जीवनाकडे पाहण्याच्या एक नवीन दृष्टिकोन मिळतो. देशात आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात नवे शोध आणि संशोधन वाढते असे सांगितले जाते. मकर आणि मिथुन राशीच्या लोकांना मे २०२५ च्या आधी पद प्रतिष्ठा आणि मान सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे. शनिवारच्या मौनी अमावस्येच्या दिवशी कुंभ स्नान केले तर ते विशेष फलदायी ठरेल. तर वृश्चिक आणि मेष राशीतील लोकांसाठी सप्तग्रह योग प्रॉपर्टी आणि धनलाभाची विशेष संधी घेऊन येत आहे. तसेच वसंत पंचमीच्या दिवशी कुंभ किंवा गंगा स्नानाने सर्व इच्छा पूर्ण होतील.सिंह आणि कर्क राशीतील लोकांनी माघी पूर्णिमेच्या दिवशी कुंभ स्नान करणे आवश्यक आहे, असे केल्यामुळे तब्येत उत्तम राहील आणि तुम्ही जे काम करत आहात त्यात यश मिळेल. तर कन्या, कुंभ आणि मीन राशीतील लोकांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभ स्नान केल्याने धनलाभ, शत्रूपासून मुक्ती, कठोर मेहनतीपासून काही प्रमाणात सुटका होवून परमशक्तींचा आशीर्वाद प्राप्त होईल.