Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shukra Gochar 2025 : मालव्य राजयोग! शुक्राचे मीन राशीत संक्रमण, मिथुनसह ५ राशींचे नशिब पालटणार, करिअरमध्ये भरघोस संधी
venus transit 2025 Rashifal : ज्योतिषशास्त्रानुसार २८ जानेवारीला शुक्राचे मीन राशीत संक्रमण होणार आहे. शुक्र त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातल पहिल्यांदाच मालव्य राजयोग तयार होत आहे. शुक्राचे संक्रमण अफाट संपत्ती, समृद्धी आणि प्रेम जीवनात आनंद देईल. मिथुनसह ५ राशींसाठी शुक्राचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल.
ज्योतिषशास्त्रानुसार २८ जानेवारीला शुक्राचे मीन राशीत संक्रमण होणार आहे. शुक्र त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातल पहिल्यांदाच मालव्य राजयोग तयार होत आहे. शुक्राचे संक्रमण अफाट संपत्ती, समृद्धी आणि प्रेम जीवनात आनंद देईल.
मीन राशी ही जल तत्वाची आहे. तसेच ती दुहेरी स्वभाव प्रदान करते. त्यामुळे शुक्र मीन राशीत उच्च स्थानावर आहे. शुक्राच्या संक्रमणामुळे मालव्ययोग हा पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक आहे. मिथुनसह ५ राशींसाठी शुक्राचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल.
वृषभ राशीवर मालव्य राजयोगाचा प्रभाव

वृषभ राशीत अकराव्या घरात शुक्राचे संक्रमण होणार आहे. हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. प्रवासादरम्यान लाभ होतील. तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण होतील. आईसोबत संबंध चांगले होतील. ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहिल. तुमच्या जीवनात आनंद येईल. आरोग्याबाबत जागरुक राहा.
मिथुन राशीवर मालव्य राजयोगाचा प्रभाव

मिथुन राशीत शुक्राचे संक्रमण दहाव्या घरात होईल. तुम्हाला करिअरमध्ये अधिक फायदा होणार आहे. बॉस आणि वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. परदेशातून करिअरसाठी चांगल्या संधी मिळतील. आयात- निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल. कामाच्या ठिकाणी काही खास व्यक्ती भेटतील.
कर्क राशीवर मालव्य राजयोगाचा प्रभाव

कर्क राशीत शुक्राचे संक्रमण ९ व्या स्थानात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कौटुंबिक आनंद आणि आईचे सुख पुरेपूर मिळेल. हे संक्रमण तुमच्यासाठी विशेष फलदायी असेल. या काळात तुम्हाला लाभ मिळेल. तुमचा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. तीर्थक्षेत्राला जाण्याची शक्यता असेल. कामानिमित्त लांबाचा प्रवास कराल. नशीबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. वाहन खरेदी कराल.
सिंह राशीवर मालव्य राजयोगाचा प्रभाव

सिंह राशीत शुक्राचे संक्रमण आठव्या घरात होणार आहे. यादरम्यान नात्यात प्रेम वाढेल. इच्छुकांना चांगला जोडीदार मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुमची प्रगती होईल. बॅकिंग किंवा महसूल क्षेत्रात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. तुमचे बोलणे अधिक गोड राहिल. सासरच्यांशी संबंध सुधारतील. मालमत्तेचे सुख मिळेल. आळस सोडावा लागेल.
धनु राशीवर मालव्य राजयोगाचा प्रभाव

धनु राशीत चौथ्या स्थानात शुक्राचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे इच्छा, नफा आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करु शकत. रिअल इस्टेट, विक्री, वास्तुविशारद, इंटेरिअर डिझायनिंग या क्षेत्रात काम करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. या काळात तुम्ही कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल.