Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shattila Ekadashi 2025: षटतिला एकादशीला करा या वस्तूंचे दान ! भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची कृपा, सुखसमृद्धीचे योग !
Shattila Ekadashi Importance of Donation: षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची विधीवत पूजा केली जाईल. षटतिला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात. आज ( २५ जानेवारी २०२५) षटतिला एकादशीचे व्रत अनेकांनी केले असले. यादिवशी विशेष वस्तूंचं दान केलं जातं, यामुळे भगवान विष्णू यांच्यासह माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो असे म्हणतात. नक्की कोणत्या वस्तूंचे दान षटतिला एकादशीला करालयला हवे, चला पाहूया.
तिळाचे दान

षटतिला एकादशीला तिळाचं दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि मानसिक शांतता येते. तिळाचं दान केल्याने नवग्रहांची शांती देखील होते. त्याशिवाय, माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.
लोकरीचे कपडे

पौष महिना असल्यामुळे थंडीशी संबंधित वस्तूंचं दान देणं महत्त्वाचं आहे. षटतिला एकादशीला उबदार कपड्यांचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. यामुळे जीवनात धन-धान्याची कमतरता राहत नाही.
गुळाचे दान

गुळाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहांशी आहे. जर तुमची प्रगती होत नसेल किंवा डोळ्यांशी संबंधित काही समस्या येत असतील तर षटतिला एकादशीला गुळाचं दान करायला हवं. गुळाचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.
अन्नदान

शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी अन्न महत्त्वाचे आहे. म्हणून षटतिला एकादशीला अन्नदान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, तसेच तुमच्या जीवनात धन-धान्याची समृद्धी राहते असे म्हणतात.