Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 26 जानेवारी 2025 : वृषभ राशीची कामे वेळेत पूर्ण होतील ! धनु राशीला मेहनतीचे फळ मिळेल ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 26 January 2025 In Marathi : 26 जानेवारी, हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आहे. आपले स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाही याचा आपण नेहमी आदर करायला हवा. आज मेष राशीच्या लोकांना कामात मदत मिळेल. मिथुन राशीचे जातक भरपूर शॉपिंग करणार आहेत तर वृश्चिक राशीसाठी खर्चात वाढ आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रवासाचा योग तर मीन राशीसाठी कामाचे डिल काही कारणाने थांबेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : जोडीदाराची प्रत्येक कामात साथ

जीवनसाथीचा पाठिंबा प्रत्येक कामात असेल. ऑफिस आणि घर यामध्ये समतोल ठेवा. पदोन्नतीसाठी चर्चा होऊ शकते. घरातील लहान सदस्यांना वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. कामे मार्गी लागतील नियोजन योग्य प्रकारे करा.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : कामे वेळेत पूर्ण होतील

आज तुम्ही उत्साहात सर्व कामे पूर्ण कराल, जी काही कामे हाती घेणार आहात त्यात यश मिळेल. सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. व्यवसायात डील करण्यापूर्वी कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : घरच्यांसाठी भरपूर शॉपिंग करणार

आज आर्थिक निर्णय घेताना सखोल विचार करा, तुम्ही पुढील काही दिवस व्यस्त असणार आहात त्यामुळे कामे लवकर मार्गी लावा. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होवू शकते. घरच्यांसोबत बाहेर जाणार आहात आणि भरपूर शॉपिंग करणार आहात.
कर्क आर्थिक राशिभविष्य : नवीन डिल फायनल होणार

आध्यात्मिक बाबतीत अधिक रूची घेणार आहात. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखणार आहा. नवीन डिल फायनल होईल आणि तुमच्या सगळ्या अटी मान्य होतील. आर्थिक स्थिती ठिक असेल.
सिंह आर्थिक राशिभविष्य : वाहन चालवताना सतर्क राहा

चांगल्या लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल त्यामुळे खूप आनंद होईल. ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या टीमवर्कचा आदर करतील आणि तुम्हाला मदत करायला पुढे येतील. खूप दिवसांपासून सुरु असणारा कायदेशीर वाद आता संपणार आहे, त्यावर तोडगा निघेल. वाहन चालवताना सतर्क राहा.
कन्या आर्थिक राशिभविष्य : कोणालाही कर्ज देवू नका

क्रिएटीव्ह कामात रुची वाढेल. इतर गोष्टींबद्दल विचार करण्याऐवजी तुमचे छंद आणि आवड तुम्ही जोपासणार आहात. पैसे कमावण्याची संधी मिळेल, त्याचा लाभ घ्या. काही आर्थिक समस्या येतील पण त्यातून बाहेर पडाल. मित्रांना किंवा कोणालाही कर्ज देवू नका.
तुळ आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थिती ठिक असेल

घरात सर्वांचं स्वास्थ्य उत्तम राहील. मन आणि शरीराचा संतुलन योग्य प्रकारे राखल्यामुळे तुम्हाला यश मिळेल. अकाउंट्सच्या फाइल्स तयार ठेवा, कामात कधीही त्याची गरज पडू शकते. कर्मचारी प्रत्येक कामात मदत करतील, त्यांच्यासोबत आदराने वागा. आर्थिक स्थिती ठिक असेल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : विचारांना प्रत्यक्षात आणण्याची संधी

तुमच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. राजकारणा तुमची रुची वाढेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळे तुमचा खर्च वाढू शकतो, पण नेहमी फायदा-नुकसान पाहू नका. कामे वाढत आहेत तुम्ही नियोजन आणि व्यवस्थापनाला महत्त्व द्या.
धनु आर्थिक राशिभविष्य : मेहनतीचे फळ मिळेल

आज कार्यक्षेत्रात भरपूर काम असेल. मेहनतीचा फायदा होईल. तुमच्या कलेवर विश्वास ठेवा आणि हे लक्षात ठेवा की काहीतरी साध्य करण्यासाठी अगदी छोट्या गोष्टीतूनही सुरुवात करता येते. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुष असतील.
मकर आर्थिक राशिभविष्य : समाधान मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे

घरातील रोजची कामे पूर्ण करताना बराचा वेळ लागणार आहे. तुमची कामे सुरळीतपणे मार्गी लागणार आहेत, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल.समाधान प्राप्त करणे हेच जीवनात महत्त्वाचे आहे. कायदेशीर कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : नवीन लोकांशी संबंध वाढवणे फायदेशीर

सकाळपासून तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहणार आहात. प्रवासाचा योग असून त्यात लाभ होईल. नवीन लोकांशी संबंध वाढवणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. कदाचित व्यवसायात डील फायनल होईल. प्रेमसंंबंध अधिक मजबूत होतील.
मीन आर्थिक राशिभविष्य : कामाचे डिल काही कारणाने थांबेल

तुमच्या दिवसाची सुरूवात मंद गतीने होईल. काही गोष्टींमुळे टेन्शन वाढेल पण दुपारपर्यंत ते कमी होईल. कार्यक्षेत्रात तुमची जागा निश्चित करण्यासाठी हुशारी आणि संयमाने काम करावे लागेल. कोणत्याही कामाचे डिल फायनल होण्यापूर्वी काही काळासाठी थांबणार आहे. तब्येतीची काळजी घ्या.