Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद

7

नांदेड दि. २८ जानेवारी : बेरोजगार युवकांना स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे दिली.

श्री गुरु गोविदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोर्डीकर नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या.

या कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ.मनोहर चासकर,माजी मुख्यमंत्री तथा  खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे , आमदार आनंदराव बोंडारकर, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.मनेश कोकरे, बाबा बलविंदर सिंग,बाबा सुखविंदर सिंह , सतीश लुसणावथ ,विनील चंद्र रांगा यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी मंत्री महोदयांनी आदर्श स्टार्टअप म्हणून  फ्लिपकार्ट ,paytm,झोमॅटो,स्वीगी,ओयो,ओला,नायका या सारख्या स्टार्टअपचे उदाहरणे देऊन युवकांना प्रेरित केले. त्या म्हणाल्या, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टिम म्हणून उदयास आला आहे. देश एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी सज्ज होत आहे. भारतामध्ये सध्या 1.25 लाखांहून अधिक स्टार्टअप आणि 110 युनिकॉर्न स्टार्टअप आहेत. ज्यांची वॅल्यूएशन रु 8,000 कोटीपेक्षा जास्त आहे.

भारतीय स्टार्टअप्स नवनवीन उद्योगधंद्यानमध्ये क्रांती घडवत आहेत.आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनत आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून युवा पिढीच्या विचारात परिवर्तन घडत आहे; नोकरी शोधणारे बनण्याऐवजी आता युवक नोकरी देणारा होण्यास उत्सुक आहेत.

भारत सरकारकडून नॅशनल क्वांटम मिशन, इंडिया एआय मिशन आणि सेमीकंडक्टर मिशन सारख्या उपक्रमांनी तरुणांसाठी संधींची दारे खुली केली आहेत.आपल्या राज्यातसुद्धा स्टार्टअप इकोसिस्टम केवळ मेट्रो शहरांपुरती मर्यादित नाही, ती आता सामाजिक संस्कृती बनत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टार्टअपच्या संधी निर्माण होत आहेत. जागतिक गुंतवणूकदार भारतामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत.

आपल्याला जर महाराष्ट्राची इकॉनोमी एक ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त करायची असेल तर सर्वात मुख्य सहभाग राहणार आहे तो म्हणजे स्टार्टअपकडून.त्याकरिता गरज आहे ती योग्य प्रशिक्षण आणि लागणाऱ्या पायाभूत सुविधांची. महाराष्ट्रातील छोट्या शहरातील होतकरू नव उदयोजकांना स्टार्टअप संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे स्टार्टअला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात असलेल्या विविध योजनांचे फायदे मराठी उद्योजकांपर्यंत पोहचत नाहीत.मराठवाड्यातील बेरोजगारी प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. इथल्या युवकांमध्ये स्वतःचा व्यवसाय उभारायचे गुण आहेत पण त्यांना स्टार्ट अप सुरु करण्यासाठी नेमके प्रशिक्षण नाही. त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना स्टार्ट अप करण्यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी  विश्वजित देशमुख व डॉ.सुजित देशमुख यांनी  हा उपक्रम सुरु केलाय.

या मिशन द्वारे  मराठवाड्यातील युवकांना स्टार्ट अप सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. स्टार्ट अप सुरु करण्यासाठी शासन कसे मदत करणार याबाबतही युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा युवकांच्या स्टार्टअप साठी भूमिका खूप अग्रेसर आहेत, असेही त्यांनी युवकांना संबोधित करताना स्पष्ट केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.