Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 70306 46046
न्यूज रिपोर्ट – फिरोज शेख
Pune Online-परिमंडळ-५ कार्यक्षेत्रातील मगरपट्टा आयटी कंपन्यांसोबत पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचा परिसंवादमहाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या ७ कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर यांचा आयटी कंपन्यांसोबत परिसंवादाचे दिनांक २९/०१/२०२५ रोजी ११.०० ते १२.३० या कालावधीमध्ये अॅम्पी थिएटर, आदीती गार्डन जवळ मगरपट्टा हडपसर पुणे येथे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांनी आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर आणि श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, व आयटी कंपन्याचे संचालक/व्यवस्थापक/आयटी अभियंता/कर्मचारी तसेच मगरपट्टा परिसरातील शाळेचे विदयार्थी इ. मान्यवर असे सुमारे १००० अधिक नागरीक उपस्थित होते.सदर समारंभामध्ये प्रमुख मार्गदर्शक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयटी कंपनीतील काम करणारे कर्मचारी तसेच अभियंते/संचालक यांचे कार्यालयात येणा-या अडीअडचणी, परिसरातील महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, तसेच मगरपट्टा परिसरात निर्माण होणारी वाहतुक समस्या यावर मार्गदर्शन केले.तसेच तंबाखु व सिगारेट मुक्त शालेय परिसराबाबत स्थानिक हडपसर पोलीसांना कोप्टा कायदा अंतर्गत कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या. पुणे शहर आयटी करीता देशातील सर्वात सुरक्षित शहर राहील या करीता पुणे पोलीस कटीबद्ध आहे असे त्यांनी प्रतिप्रादन केले.कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी केली. तर सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार अनुराधा उदमले सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणेस परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.