Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, ३० जानेवारी २०२५ : धनुसह ४ राशींच्या समस्येत वाढ! ध्येयाकडे लक्ष द्या, वाचा गुरुवारचे राशीभविष्य
Today Horoscope 30 january in Marathi, आजचे राशीभविष्य: आज ३० जानेवारीला अनेक शुभ संयोग घडत आहेत. आजपासून माघ मासातील शुक्ल पक्षाची पहिली तिथी सुरू होत आहे. गुरुवारी चंद्र कुंभ राशीत जात असून त्यामुळे गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज धनिष्ठ नक्षत्राचा शुभ संयोग आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा आहे.
आज ३० जानेवारीला अनेक शुभ संयोग घडत आहेत. आजपासून माघ मासातील शुक्ल पक्षाची पहिली तिथी सुरू होत आहे. गुरुवारी चंद्र कुंभ राशीत जात असून त्यामुळे गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज धनिष्ठ नक्षत्राचा शुभ संयोग आहे. तुमची इच्छा नसताना तुम्हाला काम करावे लागणार आहे. तुम्हाला शहाणपणाने वागावे लागेल. मनावरील ओझे हलके होईल. कुटुंबातील सदस्य आनंदी असतील. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास सल्ला घ्या. नोकरदार लोकांनी वादात पडू नका. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमचे ध्येय तुम्ही साध्य कराल. भावडांसोबत वाद असतील तर ते सुटतील. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – समस्या येतील.

आज तुम्हाला मुलाच्या शिक्षणाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमची इच्छा नसताना तुम्हाला काम करावे लागणार आहे. तुम्हाला शहाणपणाने वागावे लागेल. मनावरील ओझे हलके होईल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्त्रोचे पठण करा.
वृषभ – वाद टाळा

आज कामाच्या ठिकाणी सूचनांचे पालन कराल, ज्यामुळे आनंदी असाल. इच्छुकांचे लग्न जमेल. कुटुंबातील सदस्य आनंदी असतील. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास सल्ला घ्या. नोकरदार लोकांनी वादात पडू नका.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.
मिथुन – ध्येय साधाल

आज कामाच्या ठिकाणी इच्छेनुसार लाभ मिळतील. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमचे ध्येय तुम्ही साध्य कराल. भावडांसोबत वाद असतील तर ते सुटतील.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.
कर्क – आरोग्याची काळजी घ्या

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही समस्या आल्या तर बेफिकीर राहू नका. आज तुमच्या सहकारीचा मूड खराब राहिल.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
सिंह – पदोन्नती थांबेल

आज सरकारी कामात अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. पदोन्नतीत अडथळे येतील. डोकेदुखी वाढेल. मुलांकडून सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील. आज सासरच्या लोकांकडून आदर मिळेल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.
कन्या – चिंता वाढेल

आज व्यवसायात जितका नफा अपेक्षित होता तितका फायदा होणार नाही. खर्च वाढेल. त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. काही पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांसोबत धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा.
तुळ – यश मिळेल

आज नातेवाईकांशी केलेला करार फायदेशीर ठरेल. आईशी वाद होऊ शकतो. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. तरच यश मिळेल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा.
वृश्चिक – कामाकडे लक्ष द्या

आज कोणतेही काम नशिबावर सोडू नका. तुमच्या टीकाकारांकडे लक्ष देऊ नका. असे केले तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला तुमच्या पत्नीच्या सहकार्याची आवश्यकता राहिल. कुटुंबातील सदस्य शुभ कार्यात सहभागी होतील.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा.
धनु – समस्या येतील

आज तुमचे मन अशांत राहिल. तुमचे काम बिघडू शकते. असे केल्याने समस्या निर्माण होतील. तुमच्या हातातून वेळ निसटू शकते. मित्रांसोबत बोलण्यात वेळ घालवाल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.
मकर – संधी मिळतील.

रोजगाराच्या दिशेने काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. इच्छा नसातानाही पैसे खर्च करावा लागेल. मुलांची प्रगती पाहून आनंदी असाल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.
कुंभ – घाईत निर्णय घेऊ नका.

आज एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. आज कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका. वडिलांचा सल्ला घेऊन काम केल्यास फायदेशीर ठरेल. मुलांच्या लग्नाची चिंता वाढेल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र परिधान करा.
मीन – डील फायनल होईल

आज चुकूनही कोणत्या वाईट गोष्टीचा विचार करु नका. आज सकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ द्या. तुमच्या व्यवसायातील डील फायनल कराल. व्यावसायिक कामांसाठी लांबचा प्रवास घडेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घ्या