Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
February Horoscope 2025 Tarot Prediction : लक्ष्मी नारायण योग! मिथुनसह ५ राशींचे नशीब फळफळणार, नोकरीच्या नव्या संधी, वाचा फेब्रुवारी टॅरोकार्ड भविष्य
February Month Tarot Card Bhavishya :
ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. या महिन्यात मीन राशीत बुध आणि शुक्राचा संयोग झाल्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. तसेच या महिन्यात गुरुचा उदय होईल. ग्रहांच्या शुभ संयोगामुळे फेब्रुवारी महिना अनेक राशींसाठी लकी ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल जाणून घेऊया टॅरोकार्ड राशीभविष्यातून
ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. या महिन्यात मीन राशीत बुध आणि शुक्राचा संयोग झाल्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. तसेच या महिन्यात गुरुचा उदय होईल. ग्रहांच्या शुभ संयोगामुळे फेब्रुवारी महिना अनेक राशींसाठी लकी ठरणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांश समन्वय चांगला राहिल. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळेल. लव्ह लाईफमध्ये एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करावा. जुन्या मित्रांच्या मदतीने जोडीदार मिळू शकतो. टॅरोकार्डनुसार १२ राशींचे राशीभविष्य
मेष राशी टॅरो कार्ड भविष्य

मेष राशीच्या लोकांसाठी टॅरोकार्डनुसार या महिन्यात अनेक बदल घडतील. नवीन संधी शोधण्याची आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याची वेळ आहे. नोकरी करणाऱ्यांना टीमवर्कमध्ये काम केल्याने फायदा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांश समन्वय चांगला राहिल. नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळेल. लव्ह लाईफमध्ये एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करावा. जुन्या मित्रांच्या मदतीने जोडीदार मिळू शकतो. आरोग्याच्या काळजी घ्या. संतुलित आहार फायदेशीर ठरतील. व्यायाम करा.
वृषभ राशी टॅरो कार्ड भविष्य

टॅरो कार्डनुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी या महिन्यात मेहनतीचे फळ मिळेल. नोकरदार लोकांच्या जबाबदाऱ्या वाढतील. वेळेवर काम पूर्ण केल्यानं प्रशंसा होईल. या महिन्यात तुमचे काम पूर्ण होऊ शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक करा. प्रेमात एकमेकांच्या भावना समजून घ्या.
मिथुन राशी टॅरो कार्ड भविष्य

टॅरो कार्डनुसार हा महिना तुमच्यासाठी नवीन शक्यतांचा आहे. या काळात ज्ञानात अधिक भर पडेल. नोकरदार लोकांना नवीन भूमिका मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना तांत्रिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. मालमत्तेत गुंतवणूक करताना कागदपत्रे तपासा. नात्यात समजूतदारपणा दाखवावा लागेल. पाठीचा त्रास वाढेल.
कर्क राशी टॅरो कार्ड भविष्य

कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना आत्मनिरिक्षणाचा असेल. जुन्या योजनांचा पुनर्विचार करा. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी नेटवर्किंगकडे लक्ष द्या. संशोधन आणि विश्लेषणाच्या क्षेत्रात प्रगती होईल. नोकरदार लोकांना आव्हानांचा सामना करावा लागेल. नवीन शिकण्याची संधी देखील मिळेल. अचानक खर्च किंवा लाभ होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करु नका. प्रेमात विश्वास वाढण्यावर लक्ष केंद्रित करा. पोटाचे आजार उद्भवतील.
सिंह राशी टॅरो कार्ड भविष्य

सिंह राशीसाठी हा महिना नातेसंबंध सुधारण्याचा आहे. नात्यात सहकार्य आणि सुसंवाद ठेवा. पार्टनरशीपमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मालमत्तेत गुंतवणूक करु शकता. गुंतवणुकीबाबत माहितीपूर्ण निर्णय घ्या. नोकरदारांनी सहकाऱ्यांशी समन्वय साधा. नवीन प्रकल्पात यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांचे टीमवर्क चांगले राहिल. प्रेमसंबंधात पुढाकार घ्या.
कन्या राशी टॅरो कार्ड भविष्य

कन्या राशीच्या लोकांना या काळात कठोर परिश्रम करावे लागणार आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नोकरदार लोकांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाचा ताण वाढू शकतो. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. लहान गुंतवणुकीतून फायदा होईल. मालमत्ता किंवा कार खरेदीची योजना पुढे ढकलाल. इच्छुकांचे लग्न जमू शकते. जोडीदारांनी एकमेकांच्या भावना समजून घ्या. पोटाच्या समस्या राहातील.
तुळ राशी टॅरो कार्ड भविष्य

तुळ राशीसाठी हा महिना सर्जनशीलतेचा आहे. नवीन कल्पना आत्मसात कराल. आपली कौशल्ये वाढवण्याचा प्रयत्न कराल. प्रेमात असणारी जोडपी खास योजना आखतील. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. नोकरदार लोकांनी कल्पकतेने काम करावे. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांनी कला, शिक्षणाच्या माध्यामाकडे फोकस करावा. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पाठीच्या समस्यांकडे लक्ष द्या.
वृश्चिक राशी टॅरो कार्ड भविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना कौटुंबिक आणि शांतीचा असणार आहे. नोकरदार लोकांना अधिक जबाबदाऱ्य मिळतील. मेहनतीने वरिष्ठांचा विश्वास जिंका. मालमत्तेतील गुंतवणूक चांगली राहिल. घराच्या सजावटीवर पैसे खर्च होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. इच्छुकांचे ओळखीतून लग्न जमू शकते. पोटाच्या समस्यांकडे लक्ष द्या. तणाव कमी करा.
धनु राशी टॅरो कार्ड भविष्य

धनु राशीसाठी हा महिना धैर्य आणि संवादाचा असणार आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. नोकरदारांनी आपले विचार मांडायला हवे. सहकाऱ्यांशी चर्चा कराल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांनी मीडिया, मार्केटिंग किंवा लेखनाकडे लक्ष द्यायला हवे. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान कराल.
मकर राशी टॅरो कार्ड भविष्य

हा महिना पैसा आणि कुटुंबासाठी लकी ठरेल. तुम्हाला स्वावलंबी बनावे लागणार आहे. तुमच्या कलागुणांचा वापर करा. नोकरदारांना स्थिरता मिळेल. नवीन प्रकल्पामुळे उत्साह वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी बँकिंग, वित्त किंवा व्यवस्थापनाकडे लक्ष द्या. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. मालमत्तेत गुंतवणूक करा. कौटुंबिक संपत्तीच्या बाबतीत प्रगती होईल. अविवाहित लोकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कुंभ राशी टॅरो कार्ड भविष्य

हा महिना आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीचा असणार आहे. तुमची प्रतिमा तुम्हाला सुधारावी लागेल. ध्येय निश्चित करा. नोकरदार लोक त्यांच्या नेतृत्व कौशल्याने प्रभावित होतील. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी आत्मविश्वासाने आपली क्षमता दाखवावी. हुशारीने गुंतवणूक करा. शेअर बाजारात अचानक फायदा होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा.
मीन राशी टॅरो कार्ड भविष्य

मीन राशीसाठी हा महिना आत्मनिरिक्षण आणि आंतरिक वाढीचा असेल. जुन्या गोष्टी विसरुन नवीन सुरुवात करा. नोकरदार लोकांनी आपली कार्यशैली सुधारावी. भविष्यासाठी योजना आखावी. परदेशाशी संबंधिक काम मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी सर्जनशील क्षेत्राकडे लक्ष द्यावे. आर्थिक बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च होऊ शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आध्यात्मिक गोष्टींची आवड वाढेल.