Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
February Grah Sankraman 2025 : फेब्रुवारी महिन्यात सूर्य-शनि एकत्र! कुंभसह ५ राशींच्या अडचणीत वाढ! आर्थिक चणचण भासेल, सावध राहा
February 2025 Grah Gochar :
ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात सूर्य आणि मंगळ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. फेब्रुवारी महिन्याक सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. तर सूर्य – शनिचे संबंध प्रतिकूल मानले जातात. शनि आणि सूर्य एकाच घरात आल्यामुळे मकर राशीसह अनेक राशींच्या जीवनात समस्या येतील. जाणून घेऊया ग्रहांच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना सावध राहवे लागणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात सूर्य-मंगळसह ४ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे मकर आणि कुंभ राशीसह अनेक राशींसाठी समस्या निर्माण होतील. वृषभ राशीमध्ये गुरुचे थेट संक्रमण होईल. यानंतर बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. तर सूर्याचे देखील कुंभ राशीत संक्रमण होणार आहे. सूर्य – शनि एकत्र आल्याने अनेक राशींसाठी अडचणी निर्माण होतील.
मंगळ वृषभ राशीत संक्रमण करेल. बुधाचे मीन राशीत संक्रमण होईल. ग्रहांच्या बदलामुळे अनेक लोकांच्या जीवनात नकारात्मक परिणाम होईल. फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशीवर कसा परिणाम होणार आहे जाणून घेऊया
ग्रह संक्रमणाचा सिंह राशीवर प्रभाव

सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे संक्रमण वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करेल. यामुळे नात्यात तणाव जाणवेल. पत्नीच्या भावना समजून घ्याव्या लागतील. अन्यथा तणाव वाढेल. कोणतेही नवीन काम सुरु करु नका. पार्टनरशीपमध्ये काम करत असाल तर प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवा. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची वाट पाहावी लागेल.
ग्रह संक्रमणाचा वृश्चिक राशीवर प्रभाव

वृश्चिक राशीच्या लोकांना यावेळी कुटुंबासाठी वेळ द्यावा लागणार आहे. कुटुंबात कलह आणि भांडणे होण्याची शक्यता आहे. आईबद्दल थोडे चिंतेत असाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिकदृष्ट्या अधिक कमजोर व्हाल. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च न करणे चांगले राहिल.
ग्रह संक्रमणाचा मकर राशीवर प्रभाव

मकर राशीच्या लोकांना यावेळी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा कुटुंबात कलह वाढेल. कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करणे योग्य राहिल. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. या काळात सासरच्या लोकांशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार शुभ ठरणार नाही. गूढ ज्ञानात गुंतलेल्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. भविष्यातील योजनांबद्दल कुणाला सांगू नका.
ग्रह संक्रमणाचा कुंभ राशीवर प्रभाव

कुंभ राशीच्या लोकांनी या वेळी हाडांशी संबंधित समस्याचा सामना करावा लागेल. या काळात वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या. नात्यातील मतभेद टाळावे लागतील. पार्टनरशीपमध्ये चांगले उत्पन्न दिसून येईल. बँकेकडून मदत मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आर्थिक खात्यांमध्ये प्रामाणिक राहा.
ग्रह संक्रमणाचा मीन राशीवर प्रभाव

मीन राशीच्या लोकांना यावेळी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. अनावश्यक प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांपासून दूर राहा. तुमचे शत्रू तुमच्याविरुद्ध कट रचतील. सावध राहा.