Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 70306 46046
Pune-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार१३ जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी भोर शहरातील श्रीपतीनगरमध्ये रात्रीचे वेळी घराला कुलुप असलेल्या चार घरांमध्ये चोरट्याने घराचे कुलूप कड़ी कोयंडा तोडून घरफोडी झाली होती या चोरीमध्ये चोरटयाने घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २६,३५,८७४/- रू. चा मुद्देमाल चोरी करून नेला होता.
याबाबत माधव दामोधर पुरोहीत (वय ६४ वर्षे व्यवसाय सेवानिवृत्त, रा. श्रीपतीनगर, भोर ता. भोर जि. पुणे) यांनी भोर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकाच वेळी तब्बल चार घरांचे कुलूप तोडून चोरट्याने सोने चांदीसह रोख रक्कम चोरीला गेल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तपास पथक तयार करून घटनास्थळाकडे जाणारे येणारे सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम चोरी करण्याच्या पूर्वी सहा ते सात तास श्रीपतीनगर फिरत असल्याचे दिसून आले. फुटेज विषयी बातमीदारांकडून पडताळणी करुन घेतली असता घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन राजु माने (रा. मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर )याने केली असल्याचे निष्पन्न झाले.आरोपींचा शोध घेण्यासाठी मंगळवेढा येथे पथक गेले असता गेले असता, २४ जानेवारीला शिरवळ कडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली असता पथकाने त्याचा पाठलाग करुन पुणे-सातारा रोडवरील ससेवाडी परिसरात ताब्यात घेतले.यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (वय ३१ वर्षे रा. मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे असल्याचे सांगितले. त्याचे मूळ आधार कार्डवरील नाव लखन अशोक कुलकर्णी असून गुन्हेगार क्षेत्रात तो सचिन राजू माने या नावाने ओळखला जातो अशी माहिती प्राप्त झाली आहे. गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्याने गुन्हा केल्याचे सांगितले असून त्याने गुन्हा करणेसाठी हुंदाई इलेंट्रा कारचा वापर केला असून त्याचेकडून गुन्हयाचे तपासादरम्यान साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन किलो ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, रोख रक्कम, कार असा एकूण १६ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पोलिस स्टेशनचे चे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, अंमलदार बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश चिगळे, विजय कांचन, धिरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.