Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 1 फेब्रुवारी 2025: कामात नियोजन महत्त्वाचे ! खर्चावर नियंत्रण ठेवा, गुंतवणूक करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 1 February 2025 : आज शनिवार असून माघी गणेश जयंती आहे. त्याचबरोबर शिवयोग तयार होतो आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. सगळ्या मुलांकावर गणरायाची कृपादृष्टी पहायला मिळणार आहे. मूलांक १ सह या मूलांकासाठी मेहनत जास्त आहे पण काळजी करु नका तुम्हाला मेहनतीचे फळ मिळणार. मूलांक ४ सह या मूलांकासाठी नोकरी-व्यवसायात उत्तम संधी आहे. चला तर पाहूया मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक १ : कामात जास्त मेहनत आहे

आज दिवसभर तुम्हाला भरपूर काम आहे त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे काम आलेलं आहे पण काही कामे पूर्ण होणार नाहीत हे लक्षात ठेवा. कामात जास्त मेहनत करावी लागणार आहेत.
मूलांक २ : कामात नियोजन महत्त्वाचे

आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा ठिक नाही. ही वेळ करिअरसाठी अनुकूल नाही, तरीही योग्य प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळेल. कामात नियोजन आणि व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तब्येतीची काळजी घ्या.
मूलांक ३ : आळशीपणा वाढतोय, लक्ष द्या

आजचा दिवस ठिक नाही. तुम्हाला लोकांची मदत मिळाली नाही तर तुमचे प्रयत्न व्यर्थ आहेत असे समजा. रोजच्या कामात फार लक्ष लागणार नाही. आळशीपणा वाढतो आहे लक्ष देणे गरजेचे आहे.
मूलांक ४ : नोकरी- व्यवसायात उत्तम संधी

तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात असाल तर उत्तम संधी मिळेल. तुमची स्वतःची ओळख तयार करा, दुसऱ्या कोणाची छाप तुमच्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. कामात खूप मेहनत आहे पण तुम्हाला यश नक्की मिळेल.
मूलांक ५ : संयमाने कामे करा

नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. तुम्हाला उत्तम संधी मिळेल. पण व्यवसायात मात्र थोडा त्रास आहे, तुम्हाला ग्राहकांशी चांगला संबंध साधता येणार नाही. तुम्ही चिडचिड करु नका. धैर्य आणि संयमाने काम करा यश मिळेल.
मूलांक ६ : आदराने वागा, साधेपणा महत्त्वाचा

आजचा दिवस चांगला असून सकारात्मक प्रगती होणार आहे. सगळ्यांशी आदराने संवाद साधा. तुमच्या व्यवसायातील रणनीतीमध्ये साधेपणावर जास्त भर द्या, म्हणजे यश मिळेल. प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असणे गरजेचे आहे.
मूलांक ७ : प्रॉपर्टीच्या कामातून उत्तम लाभ

आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही जसे ठरवले होते त्याप्रमाणे तुमची कामे पूर्ण होणार नाहीत. प्रगतीच्या दिशेन तुमची वाटचाल अत्यंत संथ गतीने होणार आहे. प्रॉपर्टीच्या कामातून चांगला लाभ होऊ शकतो.
मूलांक ८ : खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे

आजचा दिवस ठिक असून धनलाभाचा योग आहे. बँक बॅलन्स वाढणार आहे. तुमची कामे मार्गी लागणार असून वेळ अनुकूल आहे. खर्च जास्त होणार आहेत, त्यावर कंट्रोल करा. मेहनत जास्त आहे पण त्याचे योग्य फळ मिळेल.
मूलांक ९ : जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करणार

जोडीदारासोबत नाराजीचा सुर असेल पण मुलांच्या सहकार्यामुळे सगळं काही सुरळीत होईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सकारात्मपणे पार पाडणार आहात. तब्येतीमध्ये सुधारणा असून तुम्ही जीवनशैलीत काही बदल करणार आहात.