Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Weekly Lucky Zodiac Sign 3 To 9 February 2025 : गजकेसरी योग! वृश्चिकसह ५ राशींना मिळणार लाभ, व्यापारात वाढ, वाचा साप्ताहिक लकी राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Sign 3 To 9 February 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गजकेसरी योग तयार होत आहे. या आठवड्यात चंद्र आणि गुरुचा संयोग झाल्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. गुरु सध्या वृषभ राशीत संक्रमण करत असून चंद्राच्या संयोगामुळे गजकसेरी योग होईल. जाणून घेऊया या आठवड्याचे साप्ताहिक लकी राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गजकेसरी योग तयार होत आहे. या आठवड्यात चंद्र आणि गुरुचा संयोग झाल्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. गुरु सध्या वृषभ राशीत संक्रमण करत असून चंद्राच्या संयोगामुळे गजकसेरी योग होईल.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वृषभसह ५ राशींना फायदा होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मोठे यश मिळेल. नोकरीमध्ये नव्या संधी मिळतील. व्यवसायात वाढ होणार आहे. जाणून घेऊया या आठवड्याचे साप्ताहिक लकी राशीभविष्य
वृषभ साप्ताहिक लकी राशीभविष्य

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहिल. आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोकांची पदोन्नती होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल.नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. प्रवास आनंददायी असेल.
सिंह साप्ताहिक लकी राशीभविष्य

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक असेल. नोकरदार लोकांना सन्मान मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. पदोन्नती अपेक्षित आहे. परदेशात करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल. कुटुंबातील मतभेद मिटतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
कन्या साप्ताहिक लकी राशीभविष्य

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अधिक फलदायी असेल. तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. मैत्रीचे रुपातंर प्रेमात होईल. तुमचा मानसिक ताण या आठवड्यात कमी होईल. नात्यात गोडवा येईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यातील अडथळे दूर होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
वृश्चिक साप्ताहिक लकी राशीभविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा आनंदाचा असेल. प्रवास, शिक्षण, करिअर आणि प्रेमसंबंधात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. अचानक फिरायला जाल. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना या आठवड्यात मोठे पद मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल.
कुंभ साप्ताहिक लकी राशीभविष्य

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असेल. या आठवड्यात तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही अधिक उत्साही असाल. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून मदत मिळेल. व्यापाऱ्यांची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. खर्चात थोडी वाढ होईल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात मेहनतीचे फळ मिळेल. काम वेळेवर पूर्ण होईल.