Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, ६ फेब्रुवारी २०२५ : मिथुनसह ४ राशींची प्रतिष्ठा वाढेल! विश्वासघात होईल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य
Today Horoscope 6 february in Marathi, आजचे राशीभविष्य: आज ६ फेब्रुवारी गुरुवार असून चंद्र वृषभ राशीत असणार आहे. तसेच कृतिका नक्षत्र, ब्रह्मा योग आणि बालव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे वृषभसह काही राशींना फायदा होईल. एखाद्या व्यक्तीला पाहून तुमच्या मनात सहानुभूती, प्रेम आणि परोपकाराची भावना निर्माण होईल. आजचा दिवस फायदेशीर असेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा आहे.
आज ६ फेब्रुवारी गुरुवार असून चंद्र वृषभ राशीत असणार आहे. तसेच कृतिका नक्षत्र, ब्रह्मा योग आणि बालव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे वृषभसह काही राशींना फायदा होईल. एखाद्या व्यक्तीला पाहून तुमच्या मनात सहानुभूती, प्रेम आणि परोपकाराची भावना निर्माण होईल. आजचा दिवस फायदेशीर असेल. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. जोडीदाराच्या कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवाल. उत्पन्नानुसार खर्च करण्याचा विचार केल्यास शहाणपणाचे ठरेल. आर्थिक संकटे येतील. स्वार्थी नात्यांपासून दूर राहा. तुमचा विश्वासघात होऊ शकतो. कोणावरही काळजीपूर्वक विश्वास ठेवा. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – फायदा होईल

आज तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. एखाद्या व्यक्तीला पाहून तुमच्या मनात सहानुभूती, प्रेम आणि परोपकाराची भावना निर्माण होईल. आजचा दिवस फायदेशीर असेल. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. जोडीदाराच्या कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवाल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा
वृषभ – विश्वासघात होईल

आज तुम्ही अडचणीत सापडू शकता. उत्पन्नानुसार खर्च करण्याचा विचार केल्यास शहाणपणाचे ठरेल. आर्थिक संकटे येतील. स्वार्थी नात्यांपासून दूर राहा. तुमचा विश्वासघात होऊ शकतो. कोणावरही काळजीपूर्वक विश्वास ठेवा.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.
मिथुन – प्रतिष्ठा वाढेल

आज तुमच्या कार्यकाळात बदल होईल. तुमच्या शब्दांनी लोकांची मने जिंकाल. लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. जीवनात आनंददायी काळ येईल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.
कर्क – इच्छा पूर्ण होतील

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. जवळचे नातेवाईक भेटायला येतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. इतरांचा आदर करा. नात्यात समंजसपणा दाखवा
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्रदान करा
सिंह – नुकसान होईल.

कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. करिअरसाठी धडपड कराल. ज्या कामात तुम्हाला स्वाभिमान मिळेल, तेच काम करण्याचा निर्णय घ्या. तुमचे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील. कौटुंबिक जीवनात हुशारीने पुढे जा.
आज भाग्य ७५ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन करा
कन्या – कामातील अडथळे दूर

आज तुमच्या लाइफ पार्टनरसोबत कुठेतरी जाण्याचा विचार कराल. कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. मित्राच्या सल्ल्याने तुमचे बिघडलेले काम पूर्ण होईल. तुमचे मन प्रसन्न राहिल. कामात येणारे अडथळे दूर होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा
तुळ – समस्या येतील

आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. काही समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडथळ्यांवर सहज मात कराल. जुन्या मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचा प्लन कराल. शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.
वृश्चिक – नुकसान होईल

आज तुमच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष द्या. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घरातील कामांसाठी वेळ मिळणार नाही. घरात काही शुभ कार्य घडतील. व्यवसायावर विशेष लक्ष द्या. नुकसान होण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.
धनु – जबाबदारी वाढेल

आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही घराबाहेर जाऊ शकता. इतरांवर विसंबून राहू नका. तुम्हाला समस्या येऊ शकतात. कुटुंबाचे काम जबाबदारीने पूर्ण कराल. मन शांततेने भरलेले राहिल.
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.
मकर – अडचणी येतील

आज कोणत्याही व्यक्तीशी संघर्ष करणे टाळा. तुम्ही असे केल्यास अडचणी येतील. कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. नशिबाची साथ मिळेल. कौटुंबिक जीवनात प्रेम वाढेल. विद्यार्थ्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे पूजन करा
कुंभ – आर्थिक स्थिती बिघडेल

आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात शांतपणे काम करावे लागेल. तुमचे नुकसान होऊ शकते. मौन राहणे अधिक चांगले राहिल. तुम्हाला पर्याय म्हणून नवीन व्यवसाय शोधायला सुरुवात करावी लागेल. तुमच्याकडे पैशांची कमतरता राहिल. आर्थिक स्थिती बिघडू शकते.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
मीन – पैसे अडकतील.

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने असेल. इच्छेनुसार तुम्हाला फायदा होईल. पैसा कुठेतरी अडकू शकतो. तुम्ही तुमचा आजचा दिवस मजेत घालवाल. आपले मन शांत ठेवा. कौटुंबिक जीवनातील आनंदी क्षण अनुभवाल.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीशिव चालीसाचे पठण करा