Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तेज पोलीस टाइम्स-परवेज शेख 70306 46046
न्यूज रिपोर्ट – फिरोज शेख पुणे
दिनांक ३०/०१/२०२५ रोजी सकाळी ०५.४५ वा चे सुमारास प्रज्ञा वॉशींग सेन्टर समोर, त्रिमुर्ती चौकाचे पुढे, भारती विद्यापीठ, पुणे येथे फिर्यादी निता रामचंद्र शिर्के, वय ५० वर्षे, व्यवसाय काही नाही, रा. श्रेयस घरकुल गर्ल हॉस्टेल, प्रज्ञा वॉशिंग सेन्टरचे गल्लीमध्ये त्रिमुर्ती चौकाजवळ, भारती विद्यापीठ, पुणे हे वॉकीग करत असताना हिरो होंडा मोटार सायकल वरुन आलेल्या दोन इसमांनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी यांचे गळयातील ४०,०००/-रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन चोरुन नेली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ७६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोथ घेणेबाबतचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मंगेश पवार, निलंश खैरमोडे, सचिन गाडे हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील राजु महादेव डेंगळे, वय २२ वर्षे, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, गल्ली नंबर १, कात्रज कोंढवा रोड, पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार आरोपी राजु डेंगळे याचा शोध घेतला असता तो कात्रज कोंढवा रोडवर मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक ०४/०२/२०२५ रोजी २०.२५ वा अटक करण्यात आली असुन आरोपीकडुन फिर्यादी यांचे चोरी केले १ तोळे वजनाची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडे आणखीन गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु.साळगावकर, राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, चेतन गोरे, महेश बारवकर, अचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.