Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख 70306 46046
गांजा विक्री करीता आलेल्या दोन इसमांना जेरबंद,अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना सिंहगड इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज गेट समोरील सार्वजनीक रोडवर सिंहगड पुणे या ठिकाणी इसम नामे १) नितीन भाऊसाहेब गोपाळ वय २० वर्षे, रा. प्लॉट नं १९, दत्त दिगंबर सोसायटी, साखरी रोड, धुळे २) लकी छोटु पवार वय १९ वर्षे, रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, प्लॉट नं १५, साखरी रोड, धुळे. यांच्या कडे किंमत रु. ९६,०२०/- चा ०४ किलो ८०१ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, २०,०००/- रु किं.ची दोन मोबाईल फोन असा १,१६,०२० /- कि.चा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला आल्याने त्यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचे इसम हे मुळचे धुळे जिल्हयातील असुन त्यांनी सदरचा गांजा कोठुन आणला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, अति, कार्यभार गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सिंहगड पोलीस स्टेशन कडील सहा पोलीस निरीक्षक वैशाली भोसले. पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, ज्ञानेश्वर घोरपडे, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे. उदमले, खुटवड यांनी केली आहे.