Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कानामागून आली अन्…; रि-रिलीज होऊनही 'सनम तेरी कसम'ला प्रेक्षकांची पसंती, तर 'लव्हयापा' फ्लॉपच्या मार्गावर

18

Loveyapa And Sanam Teri Kasam : पुन्हा प्रदर्शित होऊनसुद्धा ‘सनम तेरी कसम’ सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे तर जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा ‘लव्हयापा’ सिनेमा फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा ‘लव्हयापा’ हा चित्रपट आणला. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. जुनैदचा हा पहिलाच थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. या चित्रपटात तो श्रीदेवींची मुलगी खुशी कपूरसोबत दिसतोय. खुशी कपूरचा हा पहिलाच थिएटर रिलीज आहे. चित्रपटाबद्दल बरीच चर्चा निर्माण झाली. खुशी आणि जुनैद यांनी सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. आमिर खाननेही चित्रपटाचं प्रमोशन केलं. पण चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहिल्यानंतर असं दिसतंय की, सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.

‘लव्हयापा’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘लव्हयापा’ १.१५ कोटींनी ओपन झाला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १.५० कोटी रुपये कमावले आहेत. यानुसार, चित्रपटाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन २.६५ कोटी रुपये आहे. चित्रपटाच्या बजेटनुसार हे खूपच कमी आहे. हिमेश रेशमियाच्या ‘बॅडास रविकुमार’ सिनेमाला वाईट प्रतिसाद मिळूनही यापेक्षा चांगलं कलेक्शन करत आहे.

कानामागून आली अन्…; रि-रिलीज होऊनही ‘सनम तेरी कसम’ला प्रेक्षकांची पसंती, तर ‘लव्हयापा’ फ्लॉपच्या मार्गावर

‘लव्हयापा’ ‘सनम तेरी कसम’पेक्षा मागे पडला

‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हिट झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.१४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट आता ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. व्हॅलेंटाईन वीकचा फायदा या चित्रपटाला झालाय.
हास्यजत्रेतील ‘हा’ कलाकार आहे सचिन गोस्वामी यांच्या ‘काळजाचा तुकडा’; कौतुक करत म्हणाले…

‘लव्हयापा’ दोन दिवसांत फ्लॉप झाला

‘लव्हयापा’ ही एका तरुण जोडप्याची कथा आहे जे २४ तास एकमेकांचे फोन अदलाबदल करतात. यानंतर कथेत अनेक ट्विस्ट येतात. ‘लव्हयापा’ हा तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’चा रिमेक आहे. ‘लव्ह टुडे’चं दिग्दर्शन प्रदीप रंगनाथन यांनी केलं होतं. हा चित्रपट ६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. ‘लव्ह टुडे’ हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आणि चित्रपटाने ८३.५५ कोटी रुपये कमावले. खुशी कपूर आणि जुनैद खानच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याचं बजेट खूप मोठं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हा चित्रपट ६० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.