Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बुधादित्य राजयोगामुळे मिथुन, वृश्चिकसह या राशींसाठी आठवडा सर्वोत्तम ! कामे मार्गी लागणार, धनलाभाचे योग !पाहा तुमचे साप्ताहिक राशिभविष्य

15

Weekly Horoscope, 10 February To 16 February : फेब्रुवारीच्या या आठवड्यात बुधादित्य राजयोग असून मिथुन आणि वृश्चिक सह या 5 राशींसाठी आठवडा अतिशय उत्तम असेल. कामे पटापट मार्गी लागतील, ऑफिसमध्ये कौतुक होईल. आर्थिक बाबतीत स्थिती उत्तम असेल आणि मेहनतीचे फळ मिळाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. या आठवड्यात तुमची राशी काय सांगते आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पाहूया साप्ताहिक राशीभविष्य.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Saptahik Rashibhavishya 10 February To 16 February : हा आठवडा काही राशींसाठी शुभलाभ घेवून येणार आहे तर काही राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. फेब्रुवारीच्या या आठवड्यात बुधादित्य राजयोग तयार होत असून मिथुन आणि वृश्चिक सह या 5 राशींसाठी स्थिती उत्तम असेल. धनलाभाचा योग, कुटुंबात समाधान तसेच व्यापारात चांगला फायदा होईल. चला तर, या आठवड्यात मेष ते मीन या सर्व राशींवर ग्रह- नक्षत्राचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पाहूया साप्ताहिक राशीभविष्य.

​मेष साप्ताहिक राशीभविष्य​ – करिअर तसेच व्यवसायात उत्तम यश

हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायात खास यश आणि सन्मान घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या कामाला उत्तम न्याय दिला तसेच काम वेळेत पूर्ण केल म्हणून, तुमचा सन्मान केला जाणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमचे भरपूर कौतुक करतील. नशिबाची साथ असून धनलाभाचा योग आहे. बढतीचा योग असून या आठवड्यात तुम्हाला अनेक मोठ्या समस्यांमधून तुमची आश्चर्यकारकपणे सुटका होईल. कार्यस्थळी तुमचं कौतुक होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. व्यवसायिकांना उत्तम लाभ होणार आहे. या आठवड्यात आरोग्य ठिक असेल तसेच जे आजारी आहेत त्यांची तब्येत सुधारेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आखणार आहात. लवलाइफ ठिक असून कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल.

भाग्यशाली अंक: 15

भाग्यशाली रंग: जांभळा

​वृषभ साप्ताहिक राशीभविष्य – आर्थिक व्यवहार करताना सावध राहा

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असेल, सुख-समृद्धीमध्ये वाढ तसेच मान सन्मान होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला हवामान बदलामुळे काही आजार डोके वर काढणार आहेत पण तुम्ही त्यावर मात कराल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून लाभ होईल, मात्र या आठवड्यात कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसा गुंतवताना काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. कुटुंबात सुख-शांती असेल तसेच घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला सहकार्य करेल. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्यांवर जास्त ताण येवू शकतो. विद्यार्थ्यांना तसेच जे परीक्षा देत आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल. लवलाइफ चांगली असून जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी प्रवास करण्याचे योग येतील.

भाग्यशाली अंक: 12

भाग्यशाली रंग: सोनंरी

​मिथुन साप्ताहिक राशीभविष्य – आर्थिक स्थिती उत्तम, प्रवास लाभदायक

हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असेल. या आठवड्यात तुम्ही अनेक मंगल आणि धार्मिक कार्यात भाग घेणार आहात. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबात असा सदस्य येणार आहे ज्यामुळे वातावरण आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले क्षण घालवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. तुम्ही सहल किंवा पार्टीत सहभागी होणार आहात. तब्येत चांगली असून आर्थिक दृष्टिकोनातून ही आठवडा भाग्यशाली असेल. व्यवसायिकांना व्यवसाय वाढवण्यास यश मिळेल. वृषभ राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे मिळेल. गेल्या काही दिवसांपासून तुमचे काम थंड पडले होते पण आता चांगला जोर असेल. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेली प्रवास शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. प्रियजनांसोबत वेळ व्यतीत करणार आहात. जोडीदाराकडून एखादे सरप्राईझ गिफ्ट मिळू शकते.

भाग्यशाली अंक: 5

भाग्यशाली रंग: गुलाबी

​कर्क साप्ताहिक राशीभविष्य – कामाचे कौतुक, थांबलेली कामे पूर्ण होणार

कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ठिक असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मित्रांच्या मदतीने तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत.नोकरी करणारे आपल्या कामात फोकस ठेवतील आणि कामे वेळेत पूर्ण करतील. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. आठवड्याच्या मध्यंतरात उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. तुम्हाला वडिलोपार्जीत संपत्ती मिळू शकते. मालमत्तेसंदर्भात काही वाद असतील तर ते संपतील. कुटुंब आणि मित्रांचा सहकार्यामुळे संपूर्ण आठवडा तुम्ही उत्साही असाल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहेत. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पदोन्नती किंवा खास यश याची अपेक्षा करत असाल तर ते तुम्हाला मिळू शकते. व्यवसाय चांगला असेल. लवलाइफ उत्तम असून नाते अधिक वृद्धींगत होईल. आहाराकडे दुर्लक्ष करू नये त्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होवू शकतो. जंक फूड खाणे बंद करावे.

भाग्यशाली अंक: 6

भाग्यशाली रंग: काळा

​सिंह साप्ताहिक राशीभविष्य – वाणी तसेच रागावर नियंत्रण महत्त्वाचे

हा आठवडा सिंह राशीच्या जातकांसाठी करिअर आणि व्यवसायात अपेक्षीत लाभ आणि यश घेवून येणारा आहे. पण नातेसंबंध तसेच प्रेम याबाबतीत मात्र तुमची कसोटी असेल. आठवड्याच्या सुरुवातीला भावंडांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमची वाणी आणि वागणुक यावर पूर्ण नियंत्रण ठेवा, अन्यथा नाते एका क्षणात तुटू शकते. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गासाठी आठवड्याचा शेवट अत्यंत चांगला आहे. मोठे प्रोजेक्ट मिळणार आहे. तसेच व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरदारांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि सर्व काम नीट पार पडतील. नोकरदारांसाठी उत्पन्नाचे अनेत मार्ग खुल होणार आहेत. बँक बॅलन्स वाढेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्यासाठी अधिक वेळ देणार आहात.

भाग्यशाली अंक: 7

भाग्यशाली रंग: निळा

​कन्या साप्ताहिक राशीभविष्य – खर्चात वाढ, कामाच्या बाबतीत सतर्क राहा

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ-उतार असणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीच्या समस्या येवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक कष्ट होईल आणि तुमच्या कामावरही त्याचा प्रभाव पडेल. तुमचा आहार आणि दिनचर्या याकडे कटाक्षाने लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा कठीण असू शकतो. कार्यक्षेत्रात तुमचे विरोधक सक्रिय असतील तसेत कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, तुम्ही सतर्क राहा. कुटुंबात नातेवाईकांकडून सहकार्य न मिळाल्याने थोडी अडचण होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा सामान्य असेल, पण तरीही आर्थिक मॅनेजमेंट नीट करा कारण उत्पन्नासोबतच खर्च जास्त होणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक मोठा खर्च होवू शकतो. तुमचे बजेट थोडे गडबडेल तेव्हा सतर्क राहा. प्रेमासाठी आठवडा अनुकूल असेल. जोडीदारासोबत नाते अधिक दृढ होईल.

भाग्यशाली अंक: 8

भाग्यशाली रंग: पांढरा

​तुळ साप्ताहिक राशीभविष्य – स्वतःची कामे इतरांच्या माथी मारु नका

तुळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडा चढ-उतार असलेला असेल. कोणाशीही अनावश्यक वाद-वादविवाद टाळा. ऑफिसमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर दुर्लक्ष करणे टाळावे. नोकरी करणाऱ्यांना आपली कामे इतरांच्या माथी मारू नयेत. स्वतःची कामे स्वतः करा तुम्हाला लाभ होईल. नोकरी शोधणाऱ्यांना थोडं थांबावं लागणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला केलेल्या व्यावसायिक प्रवासात तुम्हाला हवा असलेला फायदा मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला टीकून राहण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करावी लागेल. एकूणच, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे, सतर्क राहा. प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरीने पुढे व्हा. वैवाहिक जीवन ठीक असेल.

भाग्यशाली अंक: 2

भाग्यशाली रंग: लाल

​वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य – मेहनतीचे फळ मिळेल, धनलाभाचा योग

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्यत: शुभ असून मेहनतीचा उत्तम मोबदला मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या मित्रांकडून पूर्ण मदत मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांबरोबरच सहकारी उत्तम सहकार्य करतील आणि कामे पटापट मार्गी लागतील. तब्येती बिघडण्याची शक्यता आहे. आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल. सरकारच्या मदतीने अडकलेली मोठी रक्कम तुम्ही बाहेर काढण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात मंगलकार्य पार पडतील. अविवाहित सदस्याचे लग्न ठरण्याचा योग आहे. तुम्ही घेतलेल्या एका मोठ्या निर्णयासोबत कुटुंबातील सर्व सदस्य उभे राहतील. एका महिलेच्या मदतीने प्रेमसंबंधांमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील जोडीदारासोबत प्रेम अधिक वृद्धींगत होईल.

भाग्यशाली अंक: 4

भाग्यशाली रंग: पिवळा

​धनु साप्ताहिक राशीभविष्य – जोखीम असणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा

धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र आहे. ज्या गोष्टीत जोखीम आहे त्या गोष्टीपासून दूर राहा. नोकरी करत असाल, तर तुम्हाला कार्यस्थळावर मिळालेल्या जबाबदाऱ्यांना चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा. कार्यस्थळात सीनियर आणि ज्युनिअर दोघांसोबत आदराने वागा म्हणजे कामे पटापट होतील. कोणत्याही प्रकारच्या कृतीला प्रतिक्रिया देण्यापासून दूर राहा, अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्या किंवा अपमानाचा सामना करावा लागू शकतो. जीवनाच्या अनेक समस्यांमधून आठवड्याच्या शेवटीमात्र तुम्हाला धनलाभ होवू शकतो. व्यापारी वर्गासाठी चांगला फायदा होईल. उधार दिलेला पैसा किंवा बाजारात अडकलेला पैसा मिळू शकतो. धनु राशीच्या जातकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, जर काही तक्रार असेल तर उपचार त्वरित करावा अन्यथा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध ठिक असून जोडीदारासोबत नाते अधिक मधुर होईल.

भाग्यशाली अंक: 1

भाग्यशाली रंग: जांभळा

​मकर साप्ताहिक राशीभविष्य – अतीरिक्त जबाबदारी टाळावी

मकर राशीच्या जातकांसाठी आठवड्याची सुरुवात थोड्या अडचणींसह होईल, पण नंतर सगळं काही ठिक होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येवू शकतो. तरुण वर्ग मात्र एन्जॉय करताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात ठिक ठिक असेल. मेहनतीचा फायदा मिळेल पण तुम्ही समाधानी नसाल. कार्यक्षेत्रात सीनियर्स आणि जूनियर्सकडून अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही थोडे निराश होऊ शकता. या कालाधीत तुम्ही तेव्हढीच जबाबदारी स्वीकारावी जी तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडू शकता, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आठवड्याच्या शेवटी कामानिमित्त प्रवास आहे. व्यापारी वर्गाने कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या कामावर दुर्लक्ष करणे उत्तम असेल. लवलाइफ ठिक असून कठीण काळात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

भाग्यशाली अंक: 3

भाग्यशाली रंग: हिरवा

​कुंभ साप्ताहिक राशीभविष्य- वादविवाद अधिक वाढण्याची शक्यता

कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडा टेन्शनवाला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घर, जमीन किंवा मालमत्ता यांच्या संदर्भात काही वाद असतील तर ते अधिक वाढतील. कार्यक्षेत्रात तुमचे प्रतिस्पर्धी अधिक सक्रिय होणार आहेत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. कामात अधिक फोकस राहा. तुमच्या सर्व आव्हानांमध्ये तुमच्यासोबत तुमचे मित्र असतील त्यामुळे समस्येचं निराकरण होणार याकडे लक्ष द्या. परीक्षा आणि स्पर्धात्मक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आळस सोडून अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल.विद्यार्थ्यांनी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा लागेल. लवलाइफ ठिक आहे पण काही कारणामुळे अनावश्यक समस्या आणि अपमानाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.

भाग्यशाली अंक: 9

भाग्यशाली रंग: आकाशी

​मीन साप्ताहिक राशीभविष्य – समस्या दूर होणार तसेच नातेसंबंध मधुर होतील

मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ठिक असून जीवनातील समस्या दूर होतील तसेच नात्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते कमी होतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणार आहात. जुने मित्र आणि प्रियजनांशी भेटून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात आनंदाची बातमी किंवा महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करत आहात तर फायदा दुप्पट होणार आहे. तुमच्या व्यवसायात किंवा योजनेत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. चांगल्या काळात आपल्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना विसरू नका. प्रेमसंबंधांबाबत हा आठवडा अनुकूल असेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करणार आहात.

भाग्यशाली अंक: 11

भाग्यशाली रंग: तपकिरी

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.