Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच छावा सिनेमा मालामाल, विकी कौशलच्या सिनेमाची रिलीजआधीच एवढी कमाई

9

Chhaava Movie Advance Booking: आगामी चित्रपट ‘छावा’ रिलीज होण्यापूर्वीच मालामाल झाला आहे. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून, चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. छावाच्या अ‍ॅडव्हान्स कलेक्शनबद्दल आणि त्याच्या शोबद्दल जाणून घेऊ.

हायलाइट्स:

  • छावा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
  • छत्रपती संभाजी महाराजांवर हा सिनेमा आधारित आहे
  • छावा सिनेमात विकी कौशलची प्रमुख भूमिका आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– सध्या सिनेविश्वात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ या या सिनेमाचीच चर्चा आहे. व्हॅलेंटाईन डे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या सिनेमाची प्रेक्षकांमधली क्रेझ त्याच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग मुळे समजून येते. बुकिंग सुरू झाल्यापासून फक्त एका दिवसातच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधी रुपये कमावले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ची घोषणा झाल्यापासून त्याची बरीच चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाची चर्चा आणि उत्सुकता दुप्पट झाली. या सिनेमाबाबत काही वाद पण झाले. मात्र छावाच्या ट्रेलरमधल्या प्रत्येक क्लिपने प्रेक्षकांचे डोळे पाणावले. आता लोक चित्रपटाच्या रिलीडची प्रेक्षक वाट पाहत आहेत. १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा ‘छावा’ पाहण्यासाठी लोकांनी आधीच तिकिटे बुक केली आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ४ कोटींचा चुना! हिरोइन बनायचं स्वप्न पण निर्मात्यांनीच बनवलं मूर्ख, जीवे मारण्याचीही धमकी
एका दिवसातच मालामाल झाला छावा

९ फेब्रुवारी २०२५ रोजी, निर्मात्यांनी ‘छावा’ चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. थिएटरची तिकीट खिडकी उघडताच तिकिटांची विक्री वेगाने सुरू झाली. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सॅक्निल्कच्या मते, छावाची आतापर्यंत एका दिवसात ८१९९१ तिकिटे विकली आहेत. एवढी तिकिटे विकून, छावा सिनेमाने आपल्या खात्यात सुमारे २.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.

आता नाशिक नाही इथे होणार अर्जुन प्रियाचं लग्न, साक्षीच्या डोक्याने घातला घाट, सायलीच्या मदतीला येतंय कोणीतरी खास
छावाला किती शो मिळाले

छावा सिनेमाला एकूण ५५६५ शो मिळाले आहेत, त्यापैकी हिंदी २डी ला ५४४४, हिंदी आयमॅक्स २डी ला ६१, हिंदी ४डीएक्स ला ५१ आणि हिंदी आयसीई ला ९ शो मिळाले आहेत. एकूण मिळून, छावाचे संपूर्ण भारतात ५५६५ शो लागणार आहेत. हा सिनेमा नक्कीच कोट्यवधी रुपये कमावले. छावाची अ‍ॅडव्हान्स तिकिटे ४ दिवस आधी ज्या वेगाने विकली जात आहेत ते पाहता, त्याची चांगली ओपनिंग होऊ शकते असे गृहीत धरता येते.

अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच छावा सिनेमा मालामाल, विकी कौशलच्या सिनेमाची रिलीजआधीच एवढी कमाई

छावाची कथा आणि कलाकार

छावाची कथा मराठा साम्राज्याचे धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे, तर रश्मिका मंदान्ना संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबचे पात्र सांकारुन खलभूमिकेत पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे तर निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.
आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.