Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हर्षवर्धन राणेची जादू कायम! ९ वर्षांनी पुन्हा रीलिज झालेल्या सिनेमावर पैशांचा पाऊस

16

Sanam Teri Kasam Rerelease Box Office Collection Day 3: ‘सनम तेरी कसम’ हा सिनेमा अलीकडेच पुन्हा एकदा रीलिज करण्यात आला आणि ९ वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू कायम असल्याचे दिसून आले.

हायलाइट्स:

  • तीन दिवसात ‘सनम तेरी कसम’ची बक्कळ कमाई
  • ९ वर्षांनी पुन्हा रीलिज झाला आहे सिनेमा
  • हर्षवर्धन राणे-मावरा होकेनचा सिनेमा गाजतोय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सनम तेरी कसम

मुंबई: राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केलेला रोमँटिक सिनेमा ‘सनम तेरी कसम’ २०१६ साली रीलिज झाला होता. या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांनी मुख्य भूमिका साकारलेली. ९ वर्षांपूर्वी जेव्हा हा सिनेमा रीलिज झालेला तेव्हा सपशेल आपटला होता. या सिनेमातील गाणी तुफान हिट झाली, अनेक सीन व्हायरल झाले, मात्र बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई झाली नाही. अलीकडेच ७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘सनम तेरी कसम’ पुन्हा एकदा रीलिज करण्यात आला आणि या चित्रपटाची जादू अवघ्या तीन दिवसातच पाहायला मिळाली. सिनेमाच्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, ‘सनम तेरी कसम’ने रीरीलिजनंतर भारतात एकूण १८.५६ कोटींची नेट कमाई केली आहे. रीरीलिज झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या सिनेमांच्या यादीत ‘सनम तेरी कसम’ने स्थान मिळवले. कारण ७ फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई ५.१४ कोटी रुपये झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ६.२२ कोटी रुपये कमावले. रीरीलिजनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी चित्रटाच्या कमाईत बंपर वाढ झाली असून, या दिवशी एकूण ७.२१ कोटींचा गल्ला कमावण्यात सिनेमाला यश मिळाले. ही इन्स्टाग्राम पोस्ट हर्षवर्धन राणेनेही शेअर केली.

दरम्यान ९ वर्षांपूर्वी या चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघे १.३ कोटी कमावले होते, तेव्हा ‘सनम तेरी कसम’ची एकूण कमाई ९ कोटींच्या जवळपास होती. आता या कमाईच्या दुप्पट कमाई रीरीलिजनंतर झाली आहे. तसेच सिनेमा रीरीलिज होऊन अवघे तीन दिवस झाले आहेत. चित्रपटाची घौडदौड अशीच सुरू राहिल्यास, एक मोठा गल्ला हर्षवर्धन-मावराचा सिनेमा कमावू शकेल. जुनैद खान-खुशी कपूर यांचा ‘लव्हयापा’ आणि हिमेश रेशमियाचा ‘बॅडअॅस रवीकुमार’ या चित्रपटांना ‘सनम तेरी कसम’ने धूळ चारली. रविवारी ‘लव्हयापा’ आणि ‘बॅडअॅस रवीकुमार’ या चित्रपटांनी अनुक्रमे १.६५ कोटी आणि १.५ कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे.

‘सनम तेरी कसम’च्या चाहत्यांसाठई आनंदाची बातमी म्हणजे सोहम रॉकस्टार एन्टरटेन्मेंटने या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा केली. हर्षवर्धनच यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री कोण असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.