Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune-HERO कंपणीचे लुब्रीकंट ऑईल चे H Herro या नावाने बनाटीकरण करुन पुणे शहर व परिसरात विक्री करणा-या अटक
तेज पोलीस टाइम्स-परवेज शेख 70306 46046
Pune- (H Herro 4T Oil) असा लोगो व वर्ड मार्क कॉपीराईट करुन वापरुन तयार केलेले बनावट इंजीन ऑईल च्या ९०० मिलीच्या एकुण ४७२ बॉटल, ५६० बनावट लोगो, १,२७५ खाली बॉटल व १०० बॉटल पॅक करण्याचे रिकामे बॉक्स असा एकुण २,०१,२५५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत एकुण ३,११,४१५/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
HERO कंपणीचे अधीकृत प्रतीनिधी श्री. सचीन शर्मा रा. फरीदाबाद हरीयाना यांनी त्यांचे रजीस्टर्ड HERO कंपणीचे लुब्रीकंट ऑईल चे H Herro या नावाने बनाटीकरण करुन पुणे शहर व परिसरात विक्री होत आहे. अशी त्यांना खात्रिशिर माहिती मिळाल्यावरुन त्यांनी मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांना तक्रारी अर्ज दिला होता. त्या अर्जाचे अनुशंगाने मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांचे आदेशाने युनीक अॅटोमोबाईल्स अँड स्पेअर पार्टस, गुलाम अली नगर, युसुफियॉ मस्जीद जवळ, हडपसर पुणे येथे छापा कारवाई करुन इसम नामे ताहेर बु-हानुद्दीन पुनावाला वय २० वर्षे, रा. बादशहा नगर, कोनार्कपुरम सोसायटी समोर, कोंढवा खु पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे वरील शॉपमधून H Herro या बनावटीकरण केलेल्या कंपणीचे एकुण ३०६ नग इंजीन ऑईलचे बॉटल किंमत रु. १,१०,१६०/-रुपयाच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१,६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीत इसमाकडे अधीक तपास करता त्याने सदरचा माल वाघोली येथुन विकत घेतल्याचे सांगीतल्याने वाघोली पुणे येथील एस.एफ. इंडस्ट्रीयल कारपोरेशन फर्म, वर छापा कारवाई करुन इसम नामे जावेद शेरजमा खान रा. रुम नं.१४, टिंगरेनगर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडून एकुण २,०१२५५/- रुपये किमतीचा HERO कंपणीच्या इंजीन ऑईल जप्त.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक, यांचे सुचना व व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील श्री. युवराज हांडे, सपोनि. मदन कांबळे, सपोफो राजस शेख, पो. अंमलदार तानाजी देशमुख, सचीन मेमाने, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, राहुल ढमढेरे, तसेच युनिट ६ कडील कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर व सचीन पवार यांचे पथकाने केली आहे.